शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना सातबारा माहीत आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:38 IST

या सरकारने कुठलेच नियम पाळले नाहीत; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

पुणे : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातबारामधील कॉलम काय असतात, ते तरी माहित आहे का, असा खोचक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाणाऱ्या ठाकरे यांना एका हेक्टरमध्ये किती एकर असतात, एका एकरमध्ये किती गुंठे असतात याचीच माहिती नाही. एफआरपी म्हणजे काय ते माहित नाही, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची मतदार संघातील प्रश्नांसदर्भात भेट घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, पीक कर्जाची संकल्पनाच ठाकरे यांना कळालेली नाही. सातबारा माहित नाही, बोजा चढणे काय असते ते कळत नाही. अशाातच सर्वच उसणी आश्वासने देण्याचे काम त्याच्याकडून चालू असून सर्व बट्ट्याबोळ चालला आहे. साखरेचा विषय निघाला की जयंत पाटलांकडे पाहणारे व महसूलचा विषय निघाला की बाळासाहेब थोरातांकडे पाहणारे ठाकरे हे केवळ वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मुख्यमंत्री झाले. या सरकारने कुठलेच नियम पाळले नाहीत. किमान बारा जणांचे मंत्रीमंडळ असावे असे घटनेने सांगितले आहे. परंतु, गेली महिनाभर मुख्यमंत्र्यासंह सात जणांच्या मंत्रिमंडळाने कारभार चालवीत सर्व नियम त्यांनी धाब्यावर बसविले आहेत.‘त्यांना’ एकत्र यावे लागतेकोल्हापूरला शिवसेना काँग्रेसला जाऊन मिळाली यावर पाटील म्हणाले, भाजपला हरविण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते यातच आम्हाला आनंद आहे. काँग्रेसकडून होणारा स्वा़ सावरकरांचा अपमान मुख्यमंत्री ठाकरे किती काळ सहन करणार, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटील