शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी या ६ गोष्टी करा

By admin | Updated: October 19, 2016 16:58 IST

इंटरनेटचा अधिक वापर केला असता मोबईलची बॅटरी लवकर कमी होत असल्याचे आपल्यला जाणवते. स्मार्ट फोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या जर तुम्ही आमलात आणल्यास बॅटरी वाचवाण्यासाठी फायदा होईल.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - आपल्या दैनंदिन वापरात स्मार्ट फोन हा महत्वाचा घटक आहे. आपल्या व्यवसाय, नोकरीच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच शिक्षण, मनोरंजनासाठी व आप्तेष्टांशी संवादासाठी स्मार्ट फोन अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक ठिकाणी स्मार्ट फोन आपल्या सोबतचं असतो. प्रवास करताना मनोरंजन करण्यासाठी अथवा आपला वेळ घालवण्यासाठी अधिक वापर होतो. इंटरनेटचा अधिक वापर केला असता मोबईलची बॅटरी लवकर कमी होत असल्याचे आपल्यला जाणवते. स्मार्ट फोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या जर तुम्ही आमलात आणल्यास  बॅटरी वाचवाण्यासाठी फायदा होईल. 
 
ब्राइटनेस कमी ठेवा
स्मार्ट फोनचा नेहमी ब्राइटनेस कमी ठेवा. जेणेकरुन त्याचा डोळ्याला त्रास होणार नाही आणि बॅटरी वाचण्यासही मदत होइल. (ब्राइटनेस कमी करण्यसाठी > Settings > Display > Brightness level) ऑटो ब्राइटनेस या फिचरला ऑफ करुन बॅटरी वाचवली जाईल.
 
१५ सेंकद ऐवढ्या टाईमवर मोबाईल स्क्रिन ऑफ होण्याची वेळ ठेवा. साधारण प्रत्येकाच्या मोबाइलची स्क्रिन ऑफचा टाईम हा ३० सेंकद किंव्हा त्यापेक्षा अधिक असतो. 
 
मोबईलमध्ये असणारे अॅप किती बॅटरी वापरतात हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे अनावश्यक अॅप काढून टाका. त्याचप्रमाणे Settings > Battery मध्ये पाहिल्यास कोणता अॅप किती बॅटरी वापरतो हे समजते. जो अॅप बॅटरी जास्त बापरतो त्या अॅपचा वापर कमी करा. 
 
फोनची बॅटरी कमी होत असल्यास बॅटरी सेव्ह मोड ऑन करावा. काही स्मार्ट फोनमध्ये पावर सेव्ह हे फिचर असते ते ऑन कराव. एंड्रॉइडच्या लॉलीपॉप स्मार्टफोनमध्ये हे फिचर इनबिल्ट आहे. (Settings > Battery > Battery Saver)
 
स्मार्ट फोनमध्ये दोन प्रकारचे डिस्प्ले असतात. LCD आणि AMOLED.   यामधील AMOLED अतिरिक्र बॅटरी वापरतो. जर आपल्या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले असेल(सॅमसंगच्या प्रत्येक एंड्रॉइड मध्ये राहतो) त्यावेळी आपल्या मोबाईलचा वालपेपर हा डार्क अथवा ब्लॅक वापरा. जेणेकरुन बॅटरी अधिक प्रमाणात वापरता येइल. 
 
सर्वात म्हत्वाचे - आपण एखाद्या कामात किव्हा मिंटीग मध्ये असेल त्यावेळी आपला मोबाईल व्हायब्रेट मोड वर ठेवतो. पण व्हायब्रेट मोड वर असल्यास मोबईलची बॅटरी अधिक प्रमाणात वापरली जाते. अशा वेळी आपला मोबईल सायलंट (मौन) करा. Dial pad tones, Screen locking sounds, Touch sounds हे फिचर देखिल सायलंस(मौन) ठेवा. आपली बॅटरी नक्कीच सेव्ह होण्यास मदत होइल.