शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

विश्व महिला संमेलनाच्या विरोधाला जुमानू नका - नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 23:46 IST

संयुक्त राष्ट्र संघाच्या ६२ व्या अधिवेशनाला १२ मार्च रोजी सुरूवात झाली. भारतातील सुमारे ४० प्रतिनिधी  व जगातील सरकारी व सामाजिक स्तरावरील ८००० प्रतिनिधींनी या कृतीसत्रात भाग घेतला आहे.

मुंबई - संयुक्त राष्ट्र संघाच्या ६२ व्या अधिवेशनाला १२ मार्च रोजी सुरूवात झाली. भारतातील सुमारे ४० प्रतिनिधी  व जगातील सरकारी व सामाजिक स्तरावरील ८००० प्रतिनिधींनी या कृतीसत्रात भाग घेतला आहे. स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ.डॉ.नीलम गोऱ्हे, डॉ.नंदिनी आझाद, राजस्थानच्या माजी मंत्री ऊषा पुनिया, डॉ. पाम रजपूत, जेहलम जोशी, भारत सरकारने महिला बालविकास विभागाचे संयुक्त सचिव चेतन सांधी, भारतीय दूतावासाच्या पलोमी त्रिपाठी  आदींचा यात सहभाग आहे. ग्रामीण महिलेचे सक्षमीकरण हा या सत्रातील प्रमुख विषय होता.

१५ मार्च १८रोजी  संयुक्त राष्ट्र संघाच्या इमारतीत स्वयंसेवी संस्थांच्या जाहीर सत्रात आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुद्दा उपस्थित केला की, १९९५ च्या चौथ्या विश्व महिला संमेलनात २०१७ मध्ये १५ वर्ष होत आहेत. खरेतर दर दहावर्षांनी याबाबत व्यापक स्वरूपाने पाचवे विश्व महिला संमेलन घेऊन प्रगतीचा आढावा घेणे शक्य का झाले नाही? सुप्त विरोधातून असा विरोध महिलांच्या प्रगतीला वेगळ्या मार्गाने केला जात  आहे. मग २५ वर्षातील वाटचाल पुढे नेण्यास  कशाप्रकारे जागतिक  स्तरावर  सामूहिक कार्यपद्धती हवी आहे ?कोणी किती विरोध केला म्हणून आपण व आपली पिढी स्वत:ची जबाबदारी टाळू शकत नाही हे लक्षात घेऊन  यूएन विमेन व ईतर प्रतिनिधींनी सज्ज ह्वावे असेही आ.नीलम गोर्हे यांनी ठणकावल्यावर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.युएन विमेनच्या कार्यकारी संचालक युमिसोचे मातले यांनी स्पष्ट केले की, जगात पाचव्या   महिला दशवार्षिक विश्व  संमेलनासाठी  निधी व संयोजनाची जबाबदारी घेण्यास 'अतिथी राष्ट्र' समोर आली नाहीत हे वास्तव आहे ,या अधिवेशनातही हा एक महत्वाचा विषय समोर आहे. दुर्दैवाने बदल चित्रपट व हाँलीवूड  घडवतेय असे वातावरण केले जाते परंतु महिला अधिकारांच्या आंदोलनाची दखल घेणे टाळले जाते. परंतू आपली कोणी ऊपेक्षा केली तरी  त्याचा अर्थ आपल्या  आंदोलनाने काम केले नाही असा ,य़ाचा आपण विश्वास बाळगू या. महिला चेतनेच्या  या चक्राचे काटे आता कोणीही उलटे फिरवू शकणार नाही ,असे य़ुएन विमेनने सांगून २३ मार्चला सर्वसंमत ठरावात सर्व सरकारांकडून  ठोस ऊपाय व कालबद्ध कार्यक्रमाला वचनबद्धता अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. ◆ याखेरीज दि. १३ मार्चला भारत सरकारने प्रतिनिधींच्या सन्मानार्थ चहापान व संवादात्मक बैठक आयोजित केली होतीत्याला १५ महिला संस्था  प्रतिनिधींची भारतीय दूतावसात ऊपस्थित होत्या.या बैठकीत आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुंबई पोलीसांसोबत स्त्री आधार केंद्राने आयोजित केलेले स्त्री पुरूष समानता व अंमलबजावणीबाबत घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. पंचायतराज महिला लोकप्रतिनिधींसाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यापक व्यासपीठ असावे, अधिकाऱ्यांनी एकदिवस जिल्हापरिषद, मनपा व स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला लोकप्रतिनिधींसाठी अग्रक्रमाने वेळ द्यावा, असे सुचविले ,त्या  कल्पनेचे स्वागत झाले.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात इतर राज्याप्रमाणेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असेल तरी गुन्हा शाबीत होण्याचे प्रमाण ७/८% यावरून ५०% च्याही पुढे पोचले आहे ही माहिती आ.नीलम गोर्हे यांनी  दिली. यावर भारत सरकारच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या मध्ये जी १६ कारणे शोधून दोषसिद्धीची होण्यास यारूपे उचलली गेली त्या धर्तीवर भारताच्या इतर राज्यातही कामाची गरज व्यक्त केली.  विधीमंडळातील कामकाज व विशेष अधिकार समितीच्या प्रमुख या नात्याने केलेल्या  कामाबाबत विशेष ऊत्सुकता दिसून आली. भूमी अधिकार आंदोलन व मकाम नेटवर्क,असंघटीत महिला कामगार,याबाबत संस्थाचे लढे यावरही बैठकीत प्रतिनिधींनी सूचना केल्या. यावेळी  अमेरिकेतील  भारतीय दूतावसाच्या  प्रधान सचिव श्रीमती पलोमी  त्रिपाठी देखील उपस्थित होत्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेWomenमहिला