शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:19 IST

नागपूर शहरातील एसटीच्या गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

ST Minister Pratap Sarnaik News: हिवाळी अधिवेशन आपल्या शहरांमध्ये आहे त्यामुळे मंत्री कधीही भेट देऊ शकतात. त्यासाठी केवळ देखावा म्हणून प्रवासी सुविधा निर्माण करू नका, तर वर्षातील ३६५ दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळणे हे आपल्या कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नागपूरातील गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी प्रसाधनगृह, उपहारगृह, चौकशी कक्ष, प्रवासी प्रतीक्षालय, चालक-वाहक विश्श्रांतीगृह यांसह सर्व महत्वाच्या विभागांची तपासणी केली. चालक व वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गरम पाण्याची उपलब्धता आणि इतर सुविधा सुधारल्याब‌द्दल चालक-वाहकांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

महिला कर्मचारी नियुक्त करा

बसची प्रतिक्षा करत असलेल्या NCC कॅडेट विद्यार्थी आणि प्रवाशांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी असलेल्या हिरकणी कक्षाची तपासणीही करण्यात आली. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हिरकणी कक्ष निर्माण करु नका ते अ‌द्यायावत करून तिथे महिला कर्मचारी नियुक्त करा. असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले. तपासणीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. शौचालयांची स्वच्छता समाधानकारक असल्याचे आढळले. इतर एसटी स्थानकांच्या तुलनेत नागपूर बस स्थानकात सुमारे ९० टक्के सुविधा चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र, कॅटिनमध्ये अत्यंत अस्वच्छता व दुर्गंधी आढळून आली. यावर तत्काळ कारवाईचे आदेश देत कँटिनचा परवाना रद्द करण्यासाठी महानगरपालिकेलाही सूचना करण्यात आल्या.

सोलापूरचा धसका

सोलापूर आणि धाराशिव येथील अचानक भेटीमुळे एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याची प्रचिती गणेशपेठ बसस्थानकावरील सुधारणा बघितल्यावर जाणवले, अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्यातील एसटी बसस्थानकावरील सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसत असून, हे बदल केवळ देखावा न राहता वर्षातील ३६५ दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सुचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या वि‌द्यार्थी हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक तक्रारींचे जलद निरसन होत आहे. परंतु तक्रारी होणार नाहीत अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या सेवांमध्ये स्वच्छता, सुविधा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी पुढील काळातही कडक भूमिका कायम राहील, असे सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Sarnaik: Provide 365-day Service, Not Just a Show

Web Summary : Minister Sarnaik instructed ST administration to provide consistent passenger facilities, not just temporary displays for visits. He inspected Nagpur's Ganesh Peth bus stand, emphasizing cleanliness, updated facilities, and addressing passenger concerns, warning against superficial improvements after Solapur and Dharashiv visits.
टॅग्स :state transportएसटीState Governmentराज्य सरकारpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPoliticsराजकारण