शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

फेरीवाल्यांना हटविण्यात यावं यात दुमत नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 12:47 IST

 फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांना हटवायला हवं यात दुमत नाही, पण त्याला मराठी-अमराठी रंग देणं अयोग्य, अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

ठळक मुद्दे फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांना हटवायला हवं यात दुमत नाही, पण त्याला मराठी-अमराठी रंग देणं अयोग्य, अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. फेरीवाल्यांच्या वादाला मराठी-अमराठी रुप देऊन राजकीय पोळी भाजणं चुकीचं असल्याचंही चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  म्हंटलं आहे.

मुंबई-  फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांना हटवायला हवं यात दुमत नाही, पण त्याला मराठी-अमराठी रंग देणं अयोग्य, अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. फेरीवाल्यांच्या वादाला मराठी-अमराठी रुप देऊन राजकीय पोळी भाजणं चुकीचं असल्याचंही चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  म्हंटलं आहे. अवैध फेरीवाल्यांना काढण्याचं काम सरकारचं असून त्यांना आम्ही काढूच असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. कोणत्याही संघटनेने स्टेशन परिसर मोकळा केलेला नाही, आमच्या संयुक्त टीमने हे काम केलं आहे, असं मतही मुख्यमंत्र्यांनी मांडलं आहे. 

फेरीवाला धोरण मंजूर करुन नियमही बनवले असून, मुंबई महापालिकेकडून त्याची अंलबजावणी सुरु आहे, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ समीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

सरकारमध्ये आम्ही सामूहिकरित्या काम करतोप्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना मी दिसतो, कारण या सरकारमध्ये आम्ही सामूहिकरित्या काम करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं.  शिवसेना असो किंवा भाजप, प्रत्येक प्रश्नावर मंत्र्यांसोबत उतरतो. पवारसाहेबांना या वयात मैदानात उतरावं लागतंय हे सुदैवी की दुर्दैवी त्यांनीच ठरवावं, असंही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हंटलं आहे.

मी कपटी मित्र कुणालाही म्हटलं नाही मी कपटी मित्र कुणालाही म्हटलं नाही आणि आमच्या मित्राला तर नाहीच नाही. सरकारच्या सर्व निर्णयावर टीका करण्याची मित्रपक्षाच्या काही नेत्यांना सवय आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्ष शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला आहे. थेट सरपंच निवडीला शिवसेनेने विरोध केला, मात्र तो निर्णय वगळता, सर्व निर्णय एकमताने घेतले. पूर्वी बाळासाहेब होते, चर्चा व्हायची, अलिकडे काही नेत्यांना सरकारवर टीका करण्याची सवय झाली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं. 

मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेतील इतर मुद्दे-- उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नाही.- आम्ही सगळंच केलं असं म्हणणार नाही, पण आम्ही योग्य दिशेने आहोत- 31 जानेवारीपर्यंत एलफिन्स्टन, करी रोड आणि आंबिवली स्टेशनवर फूट ओव्हर ब्रीज सैन्य बांधणार- देशात आलेला गुंतवणूकदार पहिल्यांदा महराष्ट्राकडे येतो.- मुंबई, पुणे, नागपूर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर काम सुरु- शिक्षणात 18 व्या क्रमांकावर होतो, आता 3 ऱ्या क्रमांकावर आलो, आता पहिल्या क्रमांकावर येऊ.- डिजिटायझेशनमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर- सर्वाधिक शौचालयं महाराष्ट्रात, 45 लाख शौचालय बांधली- देशातील सर्वात जास्त शौचालय, ग्रामीण घरं महाराष्ट्रात- सगळ्यात जास्त ग्रामीण घरं महाराष्ट्रात- निती आयोगाचा रिपोर्ट, सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात- महाराष्ट्रात आलेला एफडीआय 1 लाख 29 हजार कोटी आहे- नवी मुंबई, नागपूर, शिर्डी अशा सर्वच विमानतळांची काम सुरु केली.- गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात जी रेल्वेची कामं बंद होती, ती सुरु केली.- पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भार, भारतातील पायाभूत सुविधांचे जास्त प्रकल्प महाराष्ट्रात- सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च महाराष्ट्रात होतो.- सगळ्यात जास्त भर इन्फ्रास्ट्रक्चर दिला आहे.- सिंचनावर पूर्वी फक्त पैसे खर्च व्हायचे, आता रेकॉर्डब्रेक सिंचन प्रकल्प सुरु केले- शेतीचा विकासदर 12 टक्क्यांनी वाढला- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत कार्यक्रम गरजेचे, शेती शाश्वत झाल्यानंतर आत्महत्या थांबतील- आत्महत्या आम्हाला मिळालेली लिगसी, या आत्महत्या आज सुरु झाल्या नाहीत.- तीन वर्षात शेती क्षेत्रातील गुंतवणुकीत तीन पटीने वाढ- राज्यातील शेतकरी एकावेळी दोन-तीन पिकं घेतो.- खोटं बोल पण रेटून बोल, ही विरोधकांची स्टाईल 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा