शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारींना आता केराची टोपली, ‘उच्चशिक्षण’ने काढला आदेश; निवेदन देऊन होणारी लूट थांबणार

By विश्वास पाटील | Updated: February 25, 2025 18:05 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात, त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारी, अर्ज किंवा निवेदनाची अथवा त्यापुढे जाऊन दिलेल्या धमकीचा ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात, त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारी, अर्ज किंवा निवेदनाची अथवा त्यापुढे जाऊन दिलेल्या धमकीचा अजिबात विचार करू नये, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १८ फेब्रुवारीस राज्यातील शिक्षण संचालकांना; तसेच सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. अनेक लोक, संस्था, संघटना व्यक्तिगत प्रकरणे काढून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. त्यातून पैसे मिळवण्याचा धंदा करतात. त्याला या आदेशामुळे चाप बसणार आहे.

राज्य शासन याबाबत असे म्हणते की, त्रयस्थ व्यक्तींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर काय कार्यवाही करावी, याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तींनी (सामाजिक कार्यकर्ते, संस्थेशी संबंधित नसलेली व्यक्ती किंवा ज्यांच्या व्यक्तिगत कायदेशीर अधिकारांवर गदा आलेली नाही, अशी व्यक्ती) केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या आक्षेपांची नोंद हा शासन आदेश घेतो. हेमराज जगन्नाथ फेदाडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर प्रतिज्ञा चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर, ज्योती बिरादार चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर (५९७३-२०२०), संदीप चुडामण शिंदे विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर (७७४०-२०२१) या खटल्यात न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. शिक्षण विभागाने अनोळखी किंवा त्या प्रकरणाशी संबंध नसलेल्या व्यक्तीकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊ नये. कर्मचाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी अशा तक्रारी केल्या जाऊ शकतात.

तक्रारींचे स्वरूप..कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी असलेल्या शिक्षण सहसंचालक कार्यालयात दरमहा किमान शंभरावर तक्रारी येतात. त्यातील अनेक तक्रारी निनावी असतात. खोटे नाव सांगून, कार्यालयात फोन करून अमुक संस्थेत असा भ्रष्टाचार सुरू आहे, असे सांगणारे फोनही येतात.

मागण्या.. दबाव यातून सुटका होईलव्यापक जनहित असेल तर त्यासाठीची माहिती दिलीच पाहिजे; पण व्यक्तिगत तक्रारी करून ती माहिती द्या म्हणून आंदोलने केली जातात. माहिती नाही दिली तर मग विविध मागण्या पुढे करून दबाव टाकला जातो. अधिकारी त्यास जुमानत नसेल तर मग तो किती वाजता कार्यालयात आला, तिथे लोकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, असे व्हिडीओ करून त्रास दिला जातो. यालाही या आदेशाने चाप बसू शकेल, असे सरकारी अधिकाऱ्यांना वाटते. तक्रार आली की त्याचे उत्तर देण्यासाठी किमान एक पत्र तरी पाठवावेच लागते. त्यातून सुटका होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

राज्यघटनेचा पारदर्शकता हा मूळ गाभा आहे. शिक्षण विभागाचा नवीन आदेश हा त्याला छेद देणारा आहे. माहिती अधिकार कायद्यावरही या आदेशामुळे गदा येईल. -ॲड. बाबा इंदूलकर, कॉमन मॅन संघटना, कोल्हापूर 

आमच्या कार्यालयाकडे आलेल्या सर्वच तक्रारींची दखल आम्ही घेतो; महत्त्वाची परंतु अनावश्यक किंवा ज्यांचा त्या तक्रारीशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही, अशा लोकांकडून होणाऱ्या तक्रारी व त्याअन्वये होणारा मनस्ताप टाळण्यासाठी शासनाने हा आदेश काढला आहे. - डॉ. धनराज नाकाडे, सहसंचालक, उच्च व तंत्रशिक्षण, कोल्हापूर विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार