पुणे: कोरोना विषाणूंच्या उद्रेकात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते धमकीवजा भाषा बोलत आहेत. सोशल मीडियावर डॉक्टरांबद्दल शाब्दिक हिंसाचार सुरूच आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आता डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवायची का, असा संतप्त सवाल डॉक्टरांच्या संघटनांमधील प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. डॉक्टरांवरील हल्ला हा निषेधार्ह असून, आमच्यावर शस्त्रे खाली ठेवायची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. लातूर येथे एका डॉक्टरांवर प्राणघातक हल्ल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या हल्ल्याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत केली. आँनलाईन आयोजित केलेल्या या परिषदेत डॉ. मंगेश पाटे, डॉ. सुहास पिंगळे आणि आयएमएच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी उपस्थित होते. या हल्ल्यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. रुग्णालयातील कर्मचारी सोडून गेले आहेत. कमी मनुष्यबळावर खासगी डॉक्टर सरकारी आरोग्य व्यवस्थेला मदत करीत आहेत, अशा शब्दात लातूर येथील डॉक्टरांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
' हे ' सर्व पाहिल्यावर आता डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवायची का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 19:11 IST
डॉक्टरांवर होणारे हल्ले हे निषेधार्ह असून, आमच्यावर शस्त्रे खाली ठेवायची वेळ येऊ देऊ नका.
' हे ' सर्व पाहिल्यावर आता डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवायची का?
ठळक मुद्देराजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांच्याकडून धमकीची भाषासोशल मीडियावर डॉक्टरांविषयी शाब्दिक हिंसाचार सुरूचआयएमए राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांची पत्रकार परिषद