शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे रद्द करण्यास डीएसके हायकोेर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:48 IST

पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर व मुंबई येथेही गुंतवणूकदारांना फसविल्याचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई व कोल्हापूर येथे नोंदविलेले गुन्हे रद्द करावेत किंवा ते गुन्हे पुण्याच्या आर्थिक अन्वेषण गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करावेत

मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर व मुंबई येथेही गुंतवणूकदारांना फसविल्याचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई व कोल्हापूर येथे नोंदविलेले गुन्हे रद्द करावेत किंवा ते गुन्हे पुण्याच्या आर्थिक अन्वेषणगुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करावेत, यासाठी डीएसकेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत विशेष सरकारी वकील अनुपस्थित असल्याने न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.काय म्हटले आहे याचिकेत?सामान्य माणसांनी डीएसकेंच्या वेगवेगळ्या योजनेत गुंतविलेले पैसे परत करणे डीएसकेंना जमले नाही. त्यामुळे वैतागलेल्या गुंतवणूकदारांनी डीएसकेंविरुद्ध पुणे पोलिसांत तक्रार केली. त्या पाठोपाठ मुंबई व कोल्हापूर येथील गुंतवणूकदारांनीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.मात्र, एकाच गुन्ह्यासाठी सर्व ठिकाणी गुन्हे नोंदविले जाऊ शकत नाहीत, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवाला देत, डीएसकेंनी कोल्हापूर व मुंबई येथे नोंद गुन्हे रद्द करावेत किंवा पुणे ईओडब्ल्यूकडे वर्ग करावे, अशी विनंती करणारी याचिका डीएसके यांनी अ‍ॅड. घनश्याम उपाध्याय यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे.भविष्यात जरी गुंतवणूकदारांनी डीएसकेंविरुद्ध गुन्हे नोंदविले, तरी ते पुणे ईओडब्ल्यूकडे वर्ग करावेत. कारण पुणे ईओडब्ल्यू या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे, तसेच अटकपूर्व जामिनावरील अर्जाची सुनावणी करताना, न्यायालयानेही सर्व गुंतवणूकदारांचा विचार करून ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र