शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

Diwali 2021: यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; जाणून घ्या 1 ते 5 नोव्हेंबरचे पंचांग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 8:20 AM

Diwali Days: यंदा गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. या दिवसांविषयी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदा गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. सोमवारी वसूबारस असून, मंगळवारी धनत्रयोदशी आहे. शुक्रवारी दिवाळी पाडवा आणि शनिवारी भाऊबीज आहे. या दिवसांविषयी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली.

सोमवार, १ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आहे. याच दिवशी प्रदोषकाली अश्विन कृष्ण द्वादशी असल्याने याच दिवशी गोवत्स द्वादशी - वसुबारस  आहे. 

मंगळवार, २ नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आणि यमदीपदान आहे. अश्विन कृष्ण द्वादशी रोजी श्रीदत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी असते. म्हणून या दिवसास ‘गुरुद्वादशी‘ असेही म्हणतात. या दिवशी प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने याच दिवशी  धनत्रयोदशी - धन्वंतरी पूजन आहे. 

बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी आश्विन कृष्ण चतुर्दशी क्षयतिथी आहे. या दिवशी दीपावलीचा कोणताही सण नाही. 

गुरूवार, ४ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मीनिस्सारण, महावीर निर्वाण आहे. या दिवशी चंद्रोदयाच्यावेळी पहाटे ५.४९ वाजता अश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरकचतुर्दशी आहे. चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे ५.४९ वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी ६.४१ वाजेपर्यंत अभ्यंगस्नान करावयाचे आहे. 

गुरूवार, ४ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली अश्विन कृष्ण अमावास्या असल्याने प्रदोषकालात सायंकाळी ६.०३ पासून रात्री ८.३५पर्यंत लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. 

शुक्रवार, ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, विक्रम संवत् २०७८ प्रमादीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. तसेच महावीर जैन संवत् २५४८चा प्रारंभ होत आहे. याचदिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे. शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी यमद्वितीया- भाऊबीज आहे.

पुढच्या वर्षी सूर्यग्रहणपुढील वर्षी अश्विन कृष्ण अमावास्येच्या दिवशी  मंगळवार, २५ ऑक्टोबर २०२२ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसेल, असे सोमण यांनी सांगितले. पुढील वर्षी दिवाळी १० दिवस अगोदर येणार आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021