शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनो, पीडब्ल्यूडी अ‍ॅपवर नोंदणी करा! मतदान केंद्रावर मिळणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:08 IST

राज्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकांमध्ये सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने पर्सन विथ डिसॅबिलिटीज् अर्थात पीडब्ल्यूडी अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

मुंबई : राज्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकांमध्ये सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने पर्सन विथ डिसॅबिलिटीज् अर्थात पीडब्ल्यूडी अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपवर अधिकाधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. जेणेकरून संबंधित मतदारांना मतदार नोंदणी करण्यापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची मदत घेता येणार आहे.राज्यात २ लाख २४ हजार १६२ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. मुंबईसारख्या महानगरात बहुतेक मतदान केंद्रे पहिल्या किंवा त्यापेक्षा अधिक मजल्यावर आहेत. या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था नसल्यास दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणे जिकिरीचे ठरते. परिणामी, सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांचा शोध घेण्याचे काम प्रशासन करीत आहे. २०११च्या जनगणनेनुसार राज्यात २९ लाख ६९ दिव्यांगांची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्या तुलनेत झालेली मतदार नोंदणी पाहता बऱ्याच दिव्यांग मतदारांनी अद्याप दिव्यांग म्हणून नोंदणी केली नसल्याची शक्यता आयोगामधील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.नोंदणी केलेल्या दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिक मतदारांना या अ‍ॅपच्या मदतीने घरबसल्या मतदार नोंदणी करता येणार आहे. याशिवाय अ‍ॅपमुळे संबंधित मतदारांना मतदान केंद्र शोधता येईल, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अपंग मतदारांसह शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी निवडणुकीदिनी प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी मतदारांनी दिव्यांग असल्याची नोंद करण्याची गरज आहे. सध्यातरी दिव्यांग असल्याचे नमूद करण्यात मतदारांकडून टाळले जात असल्याची अडचण प्रशासनाला भेडसावत आहे. अपंग किंवा दिव्यांग म्हणून नोंद करण्याबाबत मनात न्यूनगंड असल्याने संबंधित मतदारांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. तरी अधिकाधिक नोंदणी व्हावी म्हणून प्रशासन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचीही मदत घेत असल्याची माहिती आहे.ज्येष्ठांची फरपट थांबणार!मुंबई शहरात ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या १ लाख ३५ हजार इतकी आहे. त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाहता हा आकडा १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या ज्येष्ठांची मतदानादिवशी फरपट होऊ नये, म्हणून हे अ‍ॅप उपयोगी ठरेल, अशी प्रतिक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारत