शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट; म्हणाली, "माझ्या आयुष्यातील सर्व…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 09:49 IST

अमृता फडणवीस यांनी काल आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अमृता फडणवीस यांना त्यांची लेक दीविजाने सोशल मीडियाद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असण्याबरोबरच समाजसेविका आणि गायिका म्हणूनही अमृता फडणवीसांना ओळखले जाते. त्या अनेक विषयांवर आपली परखड मतं मांडत असतात. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी काल आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अमृता फडणवीस यांना त्यांची लेक दीविजाने सोशल मीडियाद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दीविजा हिने सोशल मीडियाद्वारे आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीविजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या आईसोबतचा एक छान फोटो पोस्ट केला आहे. तसेच, पोस्टमध्ये माझी जिवलग मैत्रीण, सर्वात मजेशीर व्यक्ती आणि माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टींमध्ये सहभागी असणारी माझी साथीदार म्हणजेच माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे दीविजाने म्हटले आहे.

दीविजाच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अमृता फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही कमेंटच्या माध्यमातून दिल्या आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक 'पॉवर कपल' म्हणून पाहिले जाते. नवऱ्याच्या बाजुने ठामपणे उभं राहाताना आपण अनेकदा अमृता फडणवीस यांना पाहिले आहे. विविध राजकीय मंडळींसोबतच्या ट्विटर वॉरमुळेही अमृता चर्चेत असतात.

अमृता एक बँकर असण्याशिवाय गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील गाणीही गायली आहे. त्यांच्या गाण्यांना युट्यूबवर मिलियन्समध्ये Views आहेत. याशिवाय त्यांचा फॅशनिस्टा अंदाजही अनेकांना आवडतो, यावरुन त्यांच्यावर टीकाही होते. मात्र त्यांनी टीकाकरांना नेहमीच सडेतोड उत्तर दिले आहे. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस