शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

जिल्हा नियोजनमध्ये खडाजंगी

By admin | Updated: June 29, 2016 03:11 IST

कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होत नसतील व त्यामुुळे जिल्हयाच्या विकासाला खिळ बसत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांची गरजच काय?

पालघर : पालघर जिल्हा निर्मितीच्या दोन वर्षानंतरही सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होत नसतील व त्यामुुळे जिल्हयाच्या विकासाला खिळ बसत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करून आपले पालकमंत्री फक्त आश्वासनावर आश्वासने देत असतील तर पालघरच्या विकासाचे देवच भले करो असे उद्गार बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत काढले. व आपल्या सहकाऱ्यांसह सभात्याग केला.पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये दहा तास चालली. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आनंद ठाकूर, अमीत घोडा, पास्कल धनारे, रामनाथ मोते, रविंद्र पाठक, विलास तरे, शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर, पालक सचिव मुकेश खुल्लर आयुक्त सतिश लोखंडे, मिलींद गवारे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलिस अधिक्षक शारदा राऊत इ. सह विविध विभागचे अधिकारी उपस्थित होते.या वित्त वर्षाच्या ंंंंंंंंंंंंंसर्वसाधारण ११३.९४ कोटी च्या प्रारूप आराखडयाला बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली.तसेच २०१५-१६ च्या जिल्हावार्षिक योजना (सर्वसाधारण आदिवासी उपायोजना व विशेष घटक योजनांतर्गत मार्च २०१६ अखेरच्या खर्चास यावेळी मान्यताही देण्यात आली) तसेच गत वर्षी झालेल्या विकास कामांचा आढावाही यावेळी देण्यात आला. २०१५-१६ या वर्षात जिल्हावार्षीक योजना सर्वसाधारण ११२.५१ कोटी आदिवासी उपायोजना ४१५.३५ कोटी पैकी ४०५.२४ कोटी तर विशेष घटक योजना १३.९ कोटी पैकी ८.४६ कोटी खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली. बैठकीच्या प्रारंभीच मागील सभेचे इतिवृत्त मंजुर करण्यात आले. मात्र त्यावरील अनुपालन अहवालावर बैठकीमध्ये अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. हा विषय तब्बल सहा तास चर्चिला गेला. या दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डी.एन. रावखंडे व पाटबंधारे विभागाचे जिल्हापातळीवरचे अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आ. हितेंद्र ठाकूरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)>खासदार कपील पाटील यांच्या दांडीची चर्चाठाणे जिल्हयातुन पालघर जिल्हयात येण्यास जिल्हापरिषद कर्मचारी नाखुश असून खासदार कपील पाटील यांनी राजकीय वजन वापरल्याने ठाणे जिल्हयातील कर्मचाऱ्यांना बळ मिळत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये जि.प. कर्मचाऱ्यांच्या प्रश्न चर्चेत आल्यांनतर आपली कोंडी होईल या भीतीने खा. पाटील यांनी दांडी मारल्याची चर्चा होती.आ. हितेंद्र ठाकूरानी सभेमध्ये पालक सचिव मुकेश खुल्लर यांच्या कामकाजाची स्तुती केली. जिल्हाधिकारी बांगर हे देखील एक चांगले व्यक्तीमत्व असून त्यांचा दृष्टीकोनही जिल्हयाच्या विकासाबाबत सकारात्मक असल्याची प्रशंसा सचीव खुल्लर यांनी केली. >पालकमंत्र्यांनीच दिली कबुलीक्रीडा खात्यावर झालेला खर्च, नववीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश, वनविभागामार्फत झालेला खर्च, जिल्हापरिषदेच्या कर्मचााऱ्यांच्या समायोजन , इ. अनेक प्रश्न चर्चेला आले. ंंंंंंंंंंं यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा नवीन असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ंंंंंंंंं विकास कामावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची कबुली दिली. मात्र जिल्हयात आवश्यक अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असुन हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यानंतर आ. ठाकुरांनी सभा त्याग करून ते निघून गेले.