सिंधुदुर्गनगरी : काँग्रेस पर्यायाने नारायण राणेंचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिवसेना-भाजप आणि काही फुटीरवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना एकत्रित करत केलेल्या सहकार वैभव पॅनलचा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संकल्पसिद्धी पॅनेलने १९ पैकी १५ जागा पटकावित आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यावेळी विजयी उमेदवारांच्या जल्लोषाबरोबरच काँग्रेस आणि शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘निम का पत्ता कडवा है, राजन तेली.... है, पैसा पसरला, तेली....’ अशा तेली यांच्या विरोधात घोषणा दिल्याने राजन तेली भडकले. प्रसंगी राजन तेलींचा राग अनावर झाल्याने दगडही उचलला. त्यामुळे वातावरण तंग झाले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अखेर वातावरण निवळले.जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यावेळी सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने आणि त्याला अटकाव करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घातल्याने शांततेत चाललेल्या मतमोजणीच्या ठिकाणी काहीवेळ वातावरण तापले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने अनेक जागांवर विजय संपादित केल्याने उत्साही कार्यकर्त्यांनी भाजपच्या राजन तेलींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राजन तेली खवळले. त्यांनीही यावेळी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर चाल केली. यावेळी दगडफेक, चप्पलफेक अशाही घटना घडल्या. यामुळे अधिकच वातावरण तापले. अखेर पोलिसांनी प्रसंगावधान राखून दोन्ही गटांना हस्तक्षेप करत वातावरण शांत केले.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पॅनेलची विजयाची मिरवणूक जिल्हा बँकेपर्यंत नेण्यात आली. प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, सतीश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती संजय बोंबडी, गुरुप्रसाद पेडणेकर, अंकुश जाधव, स्नेहलता चोरगे, श्रावणी नाईक, मधुसूदन बांदिवडेकर, बाळ खडपे, प्रसाद रेगे, संदीप कुडतरकर, अबीद नाईक आदी काँग्रेस राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर सर्वत्र जल्लोष मिरवणुकाही काढल्या. (प्रतिनिधी)प्रमोद धुरीराष्ट्रवादी८२राजन तेलीभाजपा सेना७०सुरेश दळवीराष्ट्रवादी४६प्रदीप ढोलमबंडखोर३प्रमोद रावराणेभाजप२२गजानन गावडेकाँग्रेस६४अतुल काळसेकरसेना भाजप८८विलास गावडेभाजप सेना३६कृष्णनाथ तांडेलकाँग्रेस३०रामचंद्र मर्गजराष्ट्रवादी काँग्रेस६७प्रदीप प्रभुतेंडोलकर३२पीटर डॉन्टससेना भाजपा८०विकास सावंतकाँग्रेस१२७अर्चना पांगमसेना भाजपा३५९प्रज्ञा परबकाँग्रेस५५७कमल परुळेकरसेना भाजप३५९निता राणेकाँग्रेस४८९सुगंधा साटमबंडखोर४४आत्माराम ओटवणेकरराष्ट्रवादी५९२नकुल पार्सेकरसेनाभाजप३९१विद्याप्रसाद बांदेकरकाँग्रेस६०४रमण वायंगणकरशिवसेना३७९गुलाबराव चव्हाणराष्ट्रवादी६०९भालचंद्र गोसावी३७५सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याचे हे फळ आहे. जिल्हा बँकेच्या व येथील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत जिल्हा बँक आघाडीकडे ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीतर्फे प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळेच मतदारांनी आमच्या पॅनेलला विजयी केले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना कमी दराने कर्ज पुरवठा करणार आहोत. तसेच आमच्या पॅनेलचे जे चार उमेदवार पराभूत झाले आहेत ते स्वत:हून याला कारणीभूत आहेत. पक्ष कोठेही कमी पडला नाही तर संबंधित उमेदवारांचा जनतेशी असलेला संपर्क कमी पडला. त्यामुळे ते पराभूत झाले- सतीश सावंत, काँग्रेस आघाडी पॅनेलप्रमुखकाँग्रेस राष्ट्रवादीने मतदाराला धमकावून विजय मिळविला आहे. निवडणूक पत्रिकेवर सिरियल नंबर असल्याने मतदानाची गुप्तता राहिली नाही. मनात नाराजी असतानाही काही मतदारांनी भितीपोटी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला मतदान केले आहे. ही निवडणूक राजन तेलींविरूद्ध काँग्रेस राष्ट्रवादी अशी झाली. या निवडणुकीत दहशत आणि पैशाच्या जोरावर विजय संपादन केला असला तरी शिवसेना भाजपने चार जागांवर विजय मिळवून सहकार क्षेत्रात प्रवेश केला आहे.- राजन तेली, सहकार वैभव पॅनेलप्रमुखउमेदवाराचे नावतालुकापक्षमतेव्हिक्टर डान्टसमालवणराष्ट्रवादी२४आशिष परबमालवणसेनाभाजप७दिगंबर पाटीलवैभववाडीकाँग्रेस१७संजय साळुंखेवैभववाडीशिवसेना८मनिष दळवीवेंगुर्लाकाँग्रेस८राजन गावडेवेंगुर्लाशिवसेना१२दत्ताराम नाईकवेंगुर्लाबंडखोर३घाब्रियल आल्मेडासावंतवाडी६प्रकाश परबसावंतवाडीभाजप सेना१९दत्ताराम वारंगसावंतवाडीकाँग्रेस७प्रकाश बोडसदेवगडभाजप१३अविनाश माणगांवकरदेवगडकाँग्रेस२०गणेशप्रसाद गवसदोडामार्गसेना भाजप४प्रकाश गवसदोडामार्गकाँग्रेस ९सुभाष मडवकुडाळबंडखोर१०प्रकाश मोर्येकुडाळकाँग्रेस२०पुष्पसेन सावंतकुडाळभाजपसेना९
जिल्हा बँक पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे
By admin | Updated: May 8, 2015 00:07 IST