शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इन्फ्लुएंझाच्या प्रतिबंधासाठी १ लाखाहून अधिक लसींचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 09:40 IST

सध्या गरोदर मातांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात वाढत्या इन्फ्लूएंझाच्या प्रतिबंधासाठी शासनाने लसीकरण मोहिमेला गती देण्याचे निश्चित केले आहे. २०२२-२३ या वर्षामध्ये राज्यात एक लाख लसींचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत त्यापैकी ९९, ७७८ जणांना ही मात्रा देण्यात आली आहे.राज्यात सरकारतर्फे २०१५ पासून अतिजोखमीच्या व्यक्तीसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्लूएंझा लसीकरण उपलब्ध करण्यात येत आहे.

सध्या गरोदर मातांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. राज्य सरकारने एक लाख लसीच्या मात्रा खरेदी करून त्याचे मंडळनिहाय वितरण केले आहे. पुणे मंडळात सर्वाधिक ४३,११५ लसींच्या मात्रा वितरित करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल ठाणे मंडळामध्ये २८, ४०० लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, त्यातील २८ हजार २५० जणांना मात्रा देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नागपूर मंडळात ९ हजार ८५०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ८०० सर्व मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक मंडळामध्ये ४ हजार ९५० पैकी ४ हजार ९४५ आणि लातूर मंडळामध्ये ६०५० पैकी ५९८३ मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. अकोला व कोल्हापूर मंडळात फक्त १४०० मात्रांचे वितरण झाले आहे.