शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष

By admin | Updated: August 4, 2016 02:16 IST

महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारीही दिवसभर नेरूळ ते वाशी दरम्यान चक्का जाम झाला होता.

नवी मुंबई : महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारीही दिवसभर नेरूळ ते वाशी दरम्यान चक्का जाम झाला होता. सानपाडा रेल्वे स्टेशन व अन्नपूर्णा चौक ते महामार्गादरम्यानही वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास एक महिन्यापासून वाहतूकदार व नागरिक त्रस्त असताना सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर मौन बाळगले आहे. सायन - पनवेल महामार्गावरील खड्ड्यांनी नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने १२२० कोटी रूपये खर्च करून महामार्गाचे रूंदीकरण केले. परंतु वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढलीच आहे. वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरूळ ते पनवेलपर्यंत महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढली की पूर्ण वाहतूकच ठप्प होत आहे. बुधवारी दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सानपाडावरून नेरूळला जाण्यासाठी एक तास वेळ लागत होता. बसने प्रवास करणाऱ्या अनेकांनी बसमधून उतरून जवळच्या रेल्वेस्टेशनपर्यंत पायी जाणे पसंत केले. तुर्भे गावामधील भाजपा कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत केली. महामार्गावरील कोंडीमुळे अनेकांनी सानपाडा भुयारी मार्गातून पामबीच रोडवर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु अंतर्गत रोडवरही वाहतूक कोंडी असल्याने रेल्वे स्टेशनसमोरही चक्काजाम झाला होता. सानपाडा पेट्रोलपंप ते एपीएमसीपर्यंतच्या रोडवरील वाहतूकही थांबली होती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. महामार्गावर एक महिन्यापासून वाहतूक कोंडी होत आहे. वारंवार मागणी करूनही ठेकेदार खड्डे बुजवत नाही. रोज सकाळी कामावर जाताना व कामावरून येताना एक ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये जात आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे. रोज दोन ते तीन मोटारसायकल घसरून अपघात होत आहे. परंतु या समस्येकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. शहरातील छोट्याशा समस्यांवरही आंदोलन करणारे राजकीय पक्ष वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गप्प बसले आहेत. यापूर्वी शिवसेनेने महामार्गाच्या कामाविषयी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु आता राज्यातील सत्तेमध्ये सहभागी असताना व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारी आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याने व राज्यातील सत्ता असल्यामुळे तेही गप्प बसले आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसची नवी मुंबईमध्ये सत्ता आहे. परंतु राज्यात विरोधी पक्षात असल्याचा विसर त्यांना पडला असल्याची टीका शहरवासी करत आहेत. काँगे्रसही या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. ।शिवसेनेला पडला महामार्गाचा विसर सायन - पनवेल महामार्गाचे रूंदीकरण सुरू असताना सर्वाधिक आंदोलने शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. परंतु गत दोन वर्षापासून अचानक शिवसेनेने या प्रश्नावर मौन बाळगले आहे. महामार्ग रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. एक वर्षामध्ये रोडवर खड्डे पडले आहेत. पादचारी व भुयारी मार्गांचे कामही थांबले आहे. एक महिन्यापासून नवी मुंबईमधील प्रवाशांसह महामार्गावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रोज चक्का जाम होत असताना शिवसेना गप्प का, असा प्रश्नही आता शहरवासी विचारू लागले असून या समस्येवर अद्याप आंदोलन का नाही अशीही विचारणा होत आहे.