शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गडबड, कार्यमुक्ती थांबली; महसूल अप्पर आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:00 IST

शिक्षक संघटना उपोषणावर ठाम, शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३५९४ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या शिक्षकांना अद्यापपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश दिलेले नाहीत

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप शिक्षक समितीने करीत २२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विभागीय अप्पर आयुक्त राजेंद्र अहिरे यांनी शिक्षकांच्या बदल्यामध्ये झालेल्या अनियमिततेची नियमानुसार चौकशी करून अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचना सीईओंना दिल्या आहेत. या आदेशानंतरही शिक्षक समितीने उपोषण करण्यावर ठाम असल्याचे कळविले आहे.

शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३५९४ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या शिक्षकांना अद्यापपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश दिलेले नाहीत. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड यांनी सर्व संवर्गांमध्ये जवळपास ३०० बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचा दावा केला. 

हे आहेत शिक्षक संघटनांचे आक्षेपसंवर्ग १ चा लाभ घेऊन ज्यांनी शाळा बदलली, त्यातील स्वतः दिव्यांग, आजारी शिक्षक ज्यांचे पाल्य किंवा आई-वडील दिव्यांग किंवा आजारी त्याची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून केलेली नाही. त्यांनी ज्या जोडीदारामुळे संवर्ग २ चा लाभ घेतला, त्यांचे सध्याचे कार्यालयाचे अंतर बदलीपूर्वी व बदलीनंतर शासन निर्णयाप्रमाणे आहे का, याची तपासणी झालेली नाही. संवर्ग ३ मध्ये ज्यांनी बदली करून घेतली. त्यातील ज्यांच्या शाळा २०२२ मध्ये सोप्या क्षेत्रात आल्या, त्यांच्या सध्याच्या क्षेत्राची उपस्थिती ३० जून २०२२ हवी. ज्यांची नाही, त्यांची चौकशी होणे अपेक्षित आहे.  

आक्षेपांचे निरसन केले अहवाल वरिष्ठांकडेशालेय शिक्षण विभागाने उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यांचे शंकानिरसन केले आहे. बदल्यांमध्ये अनियमितता झालेल्या प्रकरणांची चौकशी केली असून, निर्णयासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आल्याचेही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

आजपासून उपोषणत्यासाठी २२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर समिती बेमुदत उपोषण करणार आहे. समितीने १८ ऑगस्टला धरणे आंदोलनही केले होते. त्याची दखल घेतली नसल्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे संघटनेने सांगितले. या उपोषणाच्या ठिकाणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे जिल्हाध्यक्ष  विजय साळकर, नितीन नवले, शामभाऊ राजपूत,  सतीश कोळी, बबन चव्हाण, आदींनी केले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक