शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त :  धर्मादाय आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:19 IST

वृद्धापकाळामुळे सध्याचे विश्वस्त कामास अयोग्य असणे आणि त्यामुळे गडावर अतिक्रमण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निरीक्षण नोंदवित श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्ट कडेपठार ट्रस्टचे सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले

ठळक मुद्देपाच जणांच्या काळजीवाहू समितीची घोषणाधर्मादाय आयुक्त नव्याने श्री  खंडोबा देवतालिंग ट्रस्टची घटना तयार पाच जणांच्या समितीच्या माध्यमातून कामकाज चालविले जाणार

पुणे : पुजारी हेच विश्वस्त असणे, वृद्धापकाळामुळे सध्याचे विश्वस्त कामास अयोग्य असणे आणि त्यामुळे गडावर अतिक्रमण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निरीक्षण नोंदवित धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी सोमवारी श्री  खंडोबा देवतालिंग ट्रस्ट कडेपठार ट्रस्टचे सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले. तसेच संबंधित ट्रस्टची नवीन घटना तयार करुन, विश्वस्तांची निवड करावी असेही आदेशात म्हटले आहे. तो पर्यंत या ट्रस्टचे कामकाज पाहण्यासाठी पाच जणांच्या काळजीवाहू समितीची घोषणा धर्मादाय आयुक्तालयाने केली. ट्रस्टचे  कामकाज पाहण्यासाठी सहायक धमार्दाय आयुक्त  पुणे, नगराध्यक्ष  जेजुरी, पोलीस  उपनिरीक्षक  जेजुरी, क्षेत्रिय  वनअधिकारी  जेजुरी , नायब तहसीलदार जेजुरी यांचा समावेश आहे. या पुर्वीचे पुण्याचे धर्र्मादाय आयुक्त शिवाजी कचरे आणि शिवकुमार डिगे यांनी देखील संबंधित विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश या पुर्वी दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात विश्वस्तांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने संबंधित विश्वस्तांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी असा आदेश दिला होता. त्या नुसार धर्मादाय सह आयुक्त देशमुख यांच्यासमोर या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी झाली. या वेळी त्यांनी सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.विश्वस्तांपैकी ५ जण वयोवृद्ध असल्याने ते काकाज करण्यास असमर्थ ठरतात. ते गडावर जाऊ शाकत नाहीत. तसेच एक विश्वस्त कायमस्वरुपी मुंबईस वास्तव्यास असून, एक जण कामकाज पहात नाही. त्यामुळे भाविकांना सोयी सुविधा देता येत नसल्याने गडावर अस्वच्छता पसरली आहे. अतिक्रमणांकडे देखील दुर्लक्ष होत आहे. या शिवाय पुजारी हेच विश्वस्त असल्याने हिशेबात गोंधळ झाला असल्याचे सिद्ध झाल्याने अखेर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा अंतिम निर्णय धर्मादाय सह आयुक्तांनी दिला. सहायक धर्मादाय आयुक्त नव्याने श्री  खंडोबा देवतालिंग ट्रस्टची घटना तयार करतील. त्यानुसार विश्वस्तांची निवड होईल. तो पर्यंत जाहीर केलेल्या पाच जणांच्या समितीच्या माध्यमातून कामकाज चालविले जाणार आहे.   

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरी