शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

राज्य सरकारचा 'हा' निर्णय ठरतोय 'मास्टरस्ट्रोक' ; घर खरेदी करणाऱ्यांसाठी हीच 'सुवर्णसंधी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 15:14 IST

महाराष्ट्राच्या निर्णयाचे केंद्राकडून कौतुक, इतर राज्यांनी मागवली माहिती...

ठळक मुद्देदोन महिन्यांत दस्त नोंदणीची संख्येत 75 हजारांची वाढ इतर राज्यांनी मागवली माहिती...

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : राज्य शासनाने बांधकाम व्यवसायला उभारी देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहीर केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत दस्त नोंदणीत चांगलीच वाढ झाली आहे. शासनाच्या महसुलात देखील मोठी भर पडत आहे. जुलै महिन्यात राज्यात केवळ 1 लाख 65 हजार 139 दस्त नोंदणी झाली होती. तर सप्टेंबर महिन्यात या मध्ये तब्बल 75 हजारांची वाढ होऊन दस्त नोंदणी 2 लाख 40 हजारांवर जाऊन पोहचली. यामध्ये दसरा- दिवाळीत मोठी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

राज्यात मार्च महिन्यात आलेली कोरोना महामारी आणि त्यानंतर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका बांधकाम व्यवसायला बसला होता. याचा शासनाच्या महसुलावर देखील फार मोठा परिणाम झाला. यामुळेच राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहिर केली. शासनाच्या या निर्णयाचा चांगला परिणाम दिसत आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण राज्यात बहुतेक सर्वच जिल्ह्यात कॅन्टेमेन्ट झोनमधील दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. यामुळे खुपच कमी प्रमाणात दस्त नोंदणी झाली. त्यानंतर शासनाच्या अनलॉक प्रक्रियेत दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यात आली. परंतु जून , जुलै महिन्यांत देखील दस्त नोंदणीत अपेक्षित वाढ झाली नाही. यामुळेच शासनाने डिसेंबर 2020  अखेर पर्यंत स्टॅम्प ड्युटीत तीन टक्के आणि त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत दोन टक्के सवलत देण्याचे जाहिर केले आहे. यात गत वर्षीच्या तुलनेत अद्यापही दस्त नोंदणी कमी असली तरी दस्त नोंदणीची वाढती संख्या समाधानकारक आहे. राज्य सुरुवातीचे तीन महिने दस्त नोंदणीत तब्बल 60 टक्के घट झाली होती. आता ही घट 30 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. ------राज्यात एप्रिल ते सप्टेंबर अखेर पर्यंत झालेली दस्त नोंदणी व मिळालेला महसुल महिना     दस्त नोंदणी       महसुल (कोटीत) एप्रिल      1139              273.39मे             39769           414.75 जून          153155         1260.54जुलै          165139         1309.92ऑगस्ट      183515         1416.45सप्टेंबर       240333        1514.74-------ग्राहकांना घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ शासनाने बांधकाम व्यावसाय आणि लोकांना दिलासा देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीत तीन टक्के सवलत दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचा चांगलाच फायदा झाला असून  दस्त नोंदणी आणि महसुलामध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या या निर्णयाचे केंद्र शासनाने कौतुक केले असून, राजस्थान व अन्य काही राज्यांनी याबाबत विचारणा केली आहे. ही तीन टक्क्यांची सवलत डिसेंबर अखेर पर्यंत आहे. यामुळेच ग्राहकांना घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ असून, जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा.- ओमप्रकाश देशमुख,  नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य --------मार्केट पुन्हा उभारी घेकोरोनामुळे मार्च ते मे-जूनमध्ये बहुतेक सर्वच व्यवहार ठप्प होते. याचा मोठा फटका बांधकाम व्यावसायाला  फटका बसला आहे. परंतु शासनाने स्टॅम्प ड्युटीत सवलत दिल्यानंतर बांधकाम व्यावसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे. बिल्डरांकडून देखील मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. यामुळे लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल.सतिश मगर, बांधकाम व्यावसायिक

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकार