शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची शिस्त बिघडली; सत्ताधारी, विरोधक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:42 IST

एका दिवसात तीनच लक्षवेधी मांडण्याचा नियम, प्रत्यक्षात ३५ लक्षवेधी; भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले....विधानभवनचे झाले लक्षवेधी भवन

मुंबई : एका दिवशी तीन लक्षवेधी मांडून त्यावर प्रत्येकी दहा-दहा मिनिटे चर्चा व्हावी, असा नियम असताना ३५-३५ लक्षवेधी मांडल्या जात आहेत. सभागृहाची शिस्त बिघडली आहे, या शब्दात विरोधी पक्ष आणि सत्तारुढ सदस्यांनीही विधानसभेत शुक्रवारी नाराजी बोलून दाखवली. गणपूर्तीअभावी दहा मिनिटे कामकाज थांबवण्याची नामुष्कीही ओढावली.  

विधानसभेत शुक्रवारी लावण्यात आलेल्या ३५ लक्षवेधीवरून भाजपचे सुधीर मुनगुंटीवार पुन्हा एकदा संतापले.

माथाडी कामगार विधेयकावर बोलताना मुनगुंटीवार म्हणाले, कामगार कायद्यात बदल करत असताना आपण कामगारांना संरक्षण देता, तसे आमदारांनादेखील संरक्षण देणे आवश्यक आहे. कारण विधिमंडळ अधिवेशनात विधेयकावर कामकाज करायचेच नाही, असे ठरलेले दिसते. सध्याचे विधानसभेचे कामकाज नियमाप्रमाणे एका टक्काही चालत नाही. त्यामुळे आपल्या नावात जरी विधानभवन असले, तरी ते आता ‘लक्षवेधी’ भवन झाले आहे,  असे मुनगंटीवार म्हणाले.  त्यांच्या मुद्द्यांना सत्ताधारी आणि विरोधकांनी टाळ्या वाजवत समर्थन दिले.

विधानभवनातही ‘लक्षवेधी‘चीच चर्चाअधिवेशनात लक्षवेधींची संख्या खूप असते. विधानभवनाच्या आवारातही पत्रकार आणि ज्येष्ठ आमदारांमध्ये एवढ्या लक्षवेधी घेण्यामागचे गुपित काय अशी चर्चा होती.

आम्ही विरोधकांना मोठी पदे देतोविधानसभेत माथाडी कामगार विधेयक मंजूर करताना गणपूर्ती कोरमसाठी अध्यक्षांनी दहा मिनिटे  बेल वाजवली. मात्र, शुक्रवार असल्याने आमदार मतदारसंघात निघून गेल्याने कोरम पूर्ण झाला नाही. शेवटी विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन करावे, अशी सूचना मुनगंटीवार यांनी मंत्री विखे पाटील यांना केली. विखे-पाटील यांनी विनंती केल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा छळ केला, आता मदत कशी लागते?

आमचे हृदय एवढे मोठे आहे की विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतो आणि त्यांना मोठमोठी पदे देतो. एवढ्या मोठ्या मनाचा पक्ष स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लाभला आहे, असा मिश्किल टोला मुनगंटीवार यांनी लगावला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

भास्कर जाधव अन् नीलेश राणे यांच्यात वाक् युद्धउद्धवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव हे सभागृहातील कामकाजाविषयी बोलत असताना शिंदेसेनेचे नीलेश राणे यांनी त्यांचा उल्लेख एकेरीत केल्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. त्यावर सभागृहाचा सन्मान कसा राखावा, हे नवीन सदस्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रतोदांकडून समजून घ्यावे, या शब्दांत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कान टोचले.

सभागृहामध्ये एका दिवसात तीनच लक्षवेधी सूचना मांडल्या जाव्यात, असा नियम आहे. पण, आज ३५ लक्षवेधी कामकाजात आहेत. सदस्यांना खुश करण्यासाठी आपण सभागृहाची ऐशीतैशी करत आहात का? असा प्रश्न शरद पवार गटाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी केला. आमदारांना खुश करण्यासाठी सभागृहाची परंपरा पायदळी तुडवू नका, असेही पाटील म्हणाले. आपल्या भावना मी अध्यक्षांकडे पोहोचवेन, असे तालिका अध्यक्ष योगेश सागर म्हणाले.

त्यानंतर उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी चार-चार तास लक्षवेधींसाठी दिला जातो, पण अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागणीवर चर्चेसाठी किती वेळ देणार आहात, या मागण्यांचा विषय हा राज्याच्या हिताचा असतो याकडे लक्ष वेधले. त्याचवेळी नीलेश राणे यांनी उभे राहून भास्कर जाधव यांच्याबाबत शेरेबाजी सुरू केली. त्यावरून उद्धवसेनेचे आमदार आणि नीलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार