शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आंदोलकांमध्ये मतभेद; भर पावसात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 15:12 IST

गेल्या ४० वर्षात तुम्ही मराठा समाजाची व्यथा ऐकली नाही त्यामुळे आज आमच्यावर ही परिस्थिती आली आहे असा आरोप त्यांनी केला.

मुंबई – जालना येथील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १० दिवसांहून अधिक काळ उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांनी मागणी आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून मराठा समाजात दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील काही जणांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून भरपावसात आंदोलन केले आहे.

मराठा ठोक मोर्चाचे प्रमुख आबा पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्यभरात काही राजकीय लोकं मराठा कुणबी, ओबीसी-कुणबी मराठा हा वाद विवाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबला पाहिजे. माझी राजकीय नेत्यांना विनंती आहे तुम्ही मराठा समाजाला सहानुभूती दाखवण्यापेक्षा, ओबीसी-कुणबी वाद लावण्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांना भेटावे, मराठा समाजाच्या व्यथा मांडाव्यात. गेल्या ४० वर्षात तुम्ही मराठा समाजाची व्यथा ऐकली नाही त्यामुळे आज आमच्यावर ही परिस्थिती आली आहे असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत आमच्या समाजाला वेगवेगळ्या विभागात विभागण्याचे काम कुणी करू नये. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र आधीच मिळत आहे. परंतु आता नवीन आदेश काढणार असाल तर तो कसा आहे तो समाजाला पटवून द्यावा. जात पडताळणी होणार आहे का? वेगवेगळी मागणी येतेय त्याचा समाजाला फायदा होणार आहे का? याचेही स्पष्टीकरण द्यावे अन्यथा जी मराठा समाजाची मागणी आहे. त्या मागणीवर सरकारने निर्णय घ्यावा, राज्यातील प्रमुख संघटना, नेते यांची सामुहिक बैठक लावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, मराठा समाजाची वाताहात होऊ देऊ नका ही आमची मागणी असल्याचे मराठा ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान,  मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागासलेले पण असलेल्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे. राज्य मागासवर्गीय आयोगातील त्रुटी दूर करून शिफारशी लागू कराव्यात ही सकल मराठा समाजाची मागणी आहे. मराठा समाजाने सरकारकडे अनेक दिवसांपासून ही मागणी केली आहे. त्याचसोबत मराठा तरुणांचे प्रश्न आहे. एमपीएससीचे प्रश्न आहेत. मराठा शेतकरी बांधवांचे प्रश्न या सर्वांवर सरकारने निर्णय घ्यायला हवा अशी आमची मागणी आहे असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण