शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
3
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
4
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
5
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
6
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
7
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
8
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
9
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
10
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
11
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
12
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
13
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
14
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
15
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
16
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
17
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
18
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
19
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
20
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

Video: अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर पीएमसी बँकेचा संचालक समोर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 21:31 IST

पीएमसी बँकेवर कर्ज वाटपावरून रिझर्व्ह बँकेने सोमवारी परिपत्रक काढून निर्बंध लागू केले.

मुंबई : राज्य बँकेमधील कथित घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलासा केला. याचबरोबर त्यांनी बंदी आणलेल्या पीएमसी बँकेचा संचालक कोण आहे, याचाही शोध घेण्याचे आव्हान पत्रकारांना केले. यानंतर पीएमसी बँकेचा संचालकाने व्हिडीओ प्रसिद्ध केला असून तो भाजपचा आमदार पूत्र आहे. 

पीएमसी बँकेवर कर्ज वाटपावरून रिझर्व्ह बँकेने सोमवारी परिपत्रक काढून निर्बंध लागू केले. रिझर्व बँकेने बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ अन्वये ही कारवाई केली आहे. यामुळे भाजप आमदार सरदार तारा सिंग यांचे पूत्र आणि बँकेचे संचालक रणजीत सिंग यांनी व्हिडिओद्वारे बँकेच्या खातेदारांसमोर बाजू मांडली आहे. 

अजित पवार यांनी आज म्हटले की, सहकारमध्ये काम करताना काय अडचणी असतात त्या 10 कोटी लोकांपैकी 1 कोटी लोकांनाच माहिती आहे. मात्र, माध्यमांमधून उरलेल्या 8-9 कोटी लोकांना वाटते भ्रष्टाचारच केला. आता यांना कुठे जाऊन सांगणार की 12 हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बँकेत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल, असाही प्रश्न उपस्थित केला. तसेच माझ्यासह भाजपाचे अन्य नेतेही संचालक होते. नुकत्याच बंदी आलेल्या पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा, असे आव्हान अजित पवारांनी पत्रकारांना दिले.  

तारासिंगांचा पूत्र काय म्हणतो? भाजपाचे मुलुंडचे आमदार सरदार तारासिंगांचा मुलगा रणजीत सिंग हे या बँकेचे संचालक आहेत. बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून बंदी आणली गेली आणि अफवा पसरविण्यात आल्या, की तारासिंगांचे कुटुंबीय बँकेचे पैसे घेऊन फरार होत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका. सांताक्रूझच्या बँकेमधील लॉकरमध्ये काही ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू होत्या. त्यांनी या वस्तू पुढील दरवाजावर गर्दी असल्याने मागील दरवाज्यातून नेल्या. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी भुमिक स्पष्ट केलेली आहे. यामुळे पैसा सुरक्षित आहे, घाबरू नका. थोडा वेळ लागेल, असे रणजीत सिंग यांनी सांगितले. 

टॅग्स :Sardar Tarasingसरदार तारासिंगAjit Pawarअजित पवारPMC Bankपीएमसी बँक