शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या तडजोडी मागे कुटनिती; पवारांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:22 IST

राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू असल्याचे बोलले जावू लागले. मात्र या तडजोडी कुटनितीचा भाग असल्याची कबुली आता शरद पवारांनी दिली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ आणि दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे गळीगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षप्रमुख शरद पवार यांनी उभारी देण्याचे काम केले होते. परंतु, ऐन प्रचाराच्या काळात पक्षात सावळा गोंधळ सुरू झाल्याचं दिसून आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले. मात्र हा सावळा गोंधळ कुटनितीचाच भाग असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारला कोणत्याही परिस्थितीत खाली खेचण्यासाठी अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोडी केल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.  जळगाव येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.  यावेळी पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली.उमेदवारी देण्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. एबी फॉर्म देण्यावरूनही गडबड झाली. तर पैठणमध्ये एकाचवेळी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. एवढच काय तर पुणे जिल्ह्यातील दोन मतदार संघात राष्ट्रवादीने उमेदवारांना एबी फॉर्मच दिले नाही. तसेच काँग्रेसला देखील ते मतदार संघ देण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीला काय साधायचा होतं, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत होता.

या व्यतिरिक्त खुद्द अजित पवारांनी सोलापूरमधील करमाळा आणि सांगोला येथील राष्ट्रवादीच्याच उमेदवारांविरुद्ध भूमिका घेतली. या दोघांना राष्ट्रवादीने खुद्द उमेदवारी जाहीर केली होती. एकूणच या घडामोडींवरून राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू असल्याचे बोलले जावू लागले. मात्र या तडजोडी कुटनितीचा भाग असल्याची कबुली आता शरद पवारांनी दिली.