शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

दिलीप माने, नागनाथ क्षीरसागर यांचा २७ ऑगस्टला तर दिलीप सोपलांचा ३१ ऑगस्टपर्यंत सेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:58 PM

ठरलं एकदाचं : विधानसभा निवडणुकीत सर्वच नेत्यांना विनाअट येण्याचे आवाहन

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने सहा प्रमुख मतदारसंघात रणनीती आखायला सुरुवातकरमाळ्यातील राष्ट्रवादी नेत्या रश्मी बागल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाराष्टÑवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष सोडण्याची तयारी दाखविली

सोलापूर: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांचा २७ ऑगस्टला तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा ३१ ऑगस्टपर्यंत शिवसेनेत जाहीर प्रवेश होईल, अशी माहिती शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीतील नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने सहा प्रमुख मतदारसंघात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. करमाळ्यातील राष्ट्रवादी नेत्या रश्मी बागल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. राष्टÑवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष सोडण्याची तयारी दाखविली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी माने यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्याशी पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती. यातील पाच जणांची नावे निश्चित करण्यात आली. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे. त्यामुळे नेत्यांनी विनाअट पक्ष प्रवेश करावा, असा निरोप ‘मातोश्री’वरून देण्यात आला होता.

 गेल्या १५ दिवसांत तानाजी सावंत यांच्याकडे गणेश वानकर, दिलीप माने, नागनाथ क्षीरसागर यांच्या बैठका झाल्या. या बैठकीनंतर माने यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचेही या नेत्याने सांगितले. माने आणि क्षीरसागर यांचा एकाच दिवशी प्रवेश होईल. यावेळी सोलापूर दक्षिणसह मोहोळ मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित असतील. माने यांच्या प्रवेशानंतर मोहोळ मतदारसंघातील शाखा बांधणीला वेग दिला जाणार आहे. 

सोपलांसाठी चर्चेची आणखी एक फेरी - शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी सोलापूर दक्षिण, बार्शी, माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातील रणनीतीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. आमदार दिलीप सोपल यांचा प्रवेश ३१ आॅगस्टपर्यंत करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र सोपलांसोबत शिवसेनेच्या नेत्यांची आणखी एक चर्चेची फेरी होणार आहे. या फेरीनंतरच सोपलांच्या सेना प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, असेही या नेत्याने सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपल