शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अटी-शर्तींमुळे उफाळू पाहणारा असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे, सुकाणू समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 18:49 IST

राज्य सरकारने आज काही शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करून शेतक-यांना कर्जमाफी देण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास सुरुवात झाली या घटनेचे सुकाणू समिती स्वागत करत आहे.

मुंबई - राज्य सरकारने आज काही शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करून शेतक-यांना कर्जमाफी देण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास सुरुवात झाली या घटनेचे सुकाणू समिती स्वागत करत आहे. संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राज्याच्या संपूर्ण कर्जमाफीचे स्वरूप स्पष्ट होईल, अशी आशा राज्यभरातील लाखो शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात मात्र एकूण किती लाख शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ होईल व एकूण किती हजार कोटींचे कर्ज माफ केले जाईल, याबाबत कोणतीही स्पष्ट आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नाही. उलट एकदाच अशी संपूर्ण आकडेवारी जाहीर न करता कर्जमाफीचे अनेक टप्पे करीत तुकड्या तुकड्याने आकडेवारी जाहीर करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.तुकड्या तुकड्याने चित्र स्पष्ट करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून आज पहिल्या टप्यात ८९ लाख बँक खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ८.५ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात आली आहे. प्राप्त माहितीची छाननी झाल्यावर टप्प्या टप्प्याने पुढील घोषणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी शर्ती लागू केल्या त्यामुळे लाखों शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. लाखों शेतकऱ्यांचा हा असंतोष एकदम भडकू नये यासाठीच सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेचे असे टप्पे केले आहेत. शेतक-यांमध्ये फूट पाडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात जी अत्यल्प आकडेवारी सरकारने समोर ठेवली, त्यातही पुन्हा नवी विसंगती समोर आली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत संपताना २१ सप्टेंबर रोजी राज्यभरातील ५८ लाख शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्याचे जाहीर करण्यात आले होते. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्यभरातील ९८ लाख बँक खातेदार शेतक-यांपैकी केवळ ५५ लाख शेतक-यांचेच ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.लावलेल्या अटी शर्तींमुळे, किचकट प्रक्रियेमुळे व आधार कार्ड सारखी कागदपत्र उपलब्ध नसल्याने राज्यभरातील ४३ लाख शेतकरी अर्जच करू शकलेले नाहीत हे यामुळे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल केलेल्या शेतक-यांपैकी अनेक शेतकरी दीड लाखां पेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी आहेत. दीड लाखांच्या वर असलेली ही रक्कम स्वत: एक रकमी भरल्या शिवाय या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. शेतीत होत असलेला तोटा पाहता शेतक-यांना एक रकमी असे लाखों रुपये बँकांमध्ये एक रकमी भरून कर्ज फेड करणे शक्य नाही. परिणामी अर्ज केलेल्या ५५ लाख शेतक-यांपैकी अनेक शेतकरी लाभा पासून वंचित राहणार आहेत. इतरही अनेक अटी लागू असल्याने अर्ज केलेल्या ५५ लाख शेतकऱ्यांपैकी अत्यल्प शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. सरकारला याची पुरेपूर कल्पना आल्यानेच अपात्र ठरलेल्या लाखों शेतक-यांचा असंतोष एकदम भडकू नये यासाठी सरकारने कर्जमाफीचे अनेक छोटे छोटे टप्पे करत शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सरकारच्या या फुटपाडया रणनीतीचा सुकाणू समिती तीव्र शब्दात धिक्कार करत आहे.राज्यातील एकूण किती शेतकऱ्यांना, एकूण किती रकमेची कर्जमाफी करणार हे जाहीर करा, सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, शेतीमालाला रास्त भावाची हमी द्या व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा या मागण्यांचा सुकाणू समिती पुनरुच्चार करत आहे. दिनांक २० ऑक्टोबर रोजी बळीप्रतिपदेच्या दिवशी आपल्या या मागण्यांसाठी बळीराजाच्या मिरवणुका काढत सरकारवर फसवणुकीचे, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे व शेतकरी विरोधी धोरणे राबवीत एक प्रकारे शेतक-यांचे खून केल्याचे गुन्हे सरकारवर दाखल करण्याचे आवाहन सुकाणू समिती राज्यातील तमाम शेतकऱ्यांना करत आहे.डॉ. अजित नवलेराज्य समन्वयक, शेतकरी संघटनांची सुकाणू समिती, महाराष्ट्रराज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा

टॅग्स :Farmerशेतकरी