शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Diesel Prices Hike: महाराष्ट्रात डिझेलचा दर 100 रुपयांच्याही वर; पेट्रोलनंतर डिझेलनंही ठोकलं शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 22:28 IST

महाराष्ट्रात डिझेलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

पेट्रेलनंतर आता डिझेलनेही शतक ठोकले आहे. महाराष्ट्रात डिझेलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. स्थानिक इंधन पंप असोसिएशनच्या एका पदाअधिकाऱ्यानुसार, मंगळवारी महाराष्ट्रातील परभणीमध्ये डिझेलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आज परभणीमध्ये डिझेल जवळपास 100.70 रुपये प्रतिलिटर, तर पेट्रोल 118.07 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात अनुक्रमे 70 पैसे आणि 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

म्हणून परभणीमध्ये महाग विकलं जातंय डिझेल? परभणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भेडसूरकर यांनी पीटीआयला-भाषासोबत बोलताना सांगितले की, "परभणीमध्ये इंधनाचा दर अधिक आहे कारण ते मनमाड डेपोतून आले जाते. येथून मनमाड डेपोचे अंतर 340 किलोमीटरहूनही अधिक आहे. आम्ही औरंगाबादमध्ये एक डेपो तयार करण्याची मागणी केली आहे. यामुळे इंधनाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी होतील. तसेच इंधन जीएसटीच्या कक्षेत आणल्यास लोकांना अधिक दिलासा मिळेल," असेही ते म्हणाले.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे नवे दर -मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 115.04 रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलने शतक गाठले असून, आता लीटरमागे 100.21 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल 109.68 रुपये असून, चेन्नईत पेट्रोलचा भाव 105.94 रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी 9 ते 12 रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते.

प्रमुख शहरांमधील डिझेलचे नवे दर -मुंबईत एक लीटर डिझेलचा दर 99.25 रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल 91.47 रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर 96 रुपये इतका असून, कोलकात्यात डिझेलचा भाव 94.62 रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी 9 ते 12 रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढू शकते. 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोलInflationमहागाईMaharashtraमहाराष्ट्र