शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

रणजीत पाटलांना ‘ते’ मंत्रिपद भोवले? अतिआत्मविश्वास नडला, प्रचार निष्क्रिय

By यदू जोशी | Published: February 04, 2023 11:38 AM

डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

- यदु जोशीमुंबई : डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि भाजपच्या अमरावती विभागातील आमदारांच्या भुवया ताणल्या गेल्या. पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाटील हे गृह, सामान्य प्रशासन आणि नगरविकास अशा अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. ‘फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती’ अशी त्यांची ओळख आहे. फडणवीस या निवडणुकीत अमरावतीला पाटील यांच्या प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी भाषणात पाटील यांची प्रशंसा केली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी खूपच कौतुक केले. इथेच पाटील यांच्याबाबत उद्या हे आमदार झाले तर पुन्हा वर बसतील, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात झाली. 

आ. रामदास आंबटकर हे भाजपचे विधान परिषद सदस्य असून पाटील यांची पक्षपातळीवर प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती. पाटील यांचे मंत्रिपद नक्की आहे असे सांगणे त्यांनी सुरू केले. पाटील यांना विजयासाठी मदत व्हावी या हेतूने केलेला हा प्रचार त्यांच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातच पाटील विधान परिषदेवर गेले तर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, मग आपल्या आमदारांची संधी हुकेल, असा विचार भाजप आमदारांच्या समर्थकांमध्ये सुरू झाला आणि त्यातूनच उत्साह निवळू लागला असे बोलले जात आहे. 

डॉ. रणजित पाटील विरुद्ध पूर्ण भाजप असे चित्र अकोला जिल्ह्यात पहिल्यापासूनच आहे. ते कायम राहिल्याचे निकालावरून दिसते. पाटील यांची निष्क्रियता, जुन्या पेन्शन योजनेची जोरदार मागणी, मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी प्रभावीपणे राबविलेली प्रचार यंत्रणा हीदेखील पाटील यांच्या पराभवाची कारणे मानली जातात. 

जितकी मतदार नोंदणी झाल्याचे प्रदेश कार्यालयाला सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात तितकी नोंदणी खरंच झाली होती का, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे. समांतर यंत्रणा पाटील यांनी राबविल्याने समन्वयाचा अभाव होता, असेही मानले जात आहे.

पक्षाकडून गंभीर दखलभाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची गुरुवारी रात्री बैठक झाली. या पराभवाची गंभीर दखल पक्षाकडून घेतली गेली असून लवकरच पाचही जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदारांना गृहित धरलेभाजपचा परंपरागत मतदार हा भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे, तो जाईल कुठे हा अतिआत्मविश्वास नडला. रा. स्व. संघाची यंत्रणा, भाजपची यंत्रणा आणि पाटील यांच्यात शेवटपर्यंत योग्य ताळमेळ झाला नाही असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक