शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Dhule ZP Election Results 2021 Live: चंद्रकांत पाटलांची कन्या धरती देवरे विजयी; बहुमतासाठी भाजपाला एका जागेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 11:22 IST

Dhule ZP Election Results: BJP Chandrakant Patil daughter Dharti Deore wins: धुळ्यात भाजपाला बहुमतासाठी १४ जागांपैकी २ जागांची गरज आहे. याठिकाणी जिल्हा परिषद १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी मतदान झाले.

धुळे – राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. धुळ्यात जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपाला २ जागांची गरज आहे. यातील १ जागा जिंकत भाजपानं विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उर्फ सी.आर पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. Dhule ZP Election Results 2021: BJP Chandrakant Patil daughter Dharti Deore wins

धरती देवरे या सी. आर पाटील यांच्या कन्या आहेत. त्या लामक गटातून जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत उभ्या होत्या. भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत धरती देवरे यांनी बाजी मारली आहे. मागील निवडणुकीत धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. धुळ्यात भाजपाला बहुमतासाठी १४ जागांपैकी २ जागांची गरज आहे. याठिकाणी जिल्हा परिषद १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी मतदान झाले. यातील एका गटात शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

सध्या धुळे जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाच्या हातात आहे. याठिकाणी ५६ पैकी २७ जागा भाजपाकडे आहेत तर शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस ३ तर काँग्रेसकडे ६ जागा आहेत. धरती देवरे यांच्या विजयानंतर आता भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी एका जागेची गरज आहे. महाविकास आघाडीने भाजपाला बहुमत मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. भाजपाला जागा मिळू देणार नाही असा दावाही काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी केला होता.

Maharashtra ZP Election Results 2021 LIVE: नंदुरबारमध्ये भाजपा नेते विजयकुमार गावितांची कन्या सुप्रिया गावित विजयी

मागच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी ३९ जागांवर विजय मिळवित भाजपने प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवित सत्ता परिवर्तन केले होते. परंतु ओबीसी आरक्षणावरून भाजपाच्या १२ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर भाजपाचे संख्याबळ २७ इतके झाले. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी २९ सदस्यांचे संख्याबळ हवं. त्यामुळे भाजपाला जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी २ जागांची गरज होती. त्यातील १ जागा भाजपाच्या खात्यात जमा झाली आहे.

पक्षीय बलाबल

एकूण जागा - ५६

भाजप – ३९ – १२ = २७

काँग्रेस – ०७ – १ = ६

शिवसेना – ०४ – २ = २

राष्ट्रवादी - ०३

अपक्ष - ०३

टॅग्स :BJPभाजपाZP Electionजिल्हा परिषदDhuleधुळेOBCअन्य मागासवर्गीय जाती