शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय', गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 10:09 IST

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचेही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन अभिष्टचिंतन केले आहे.

मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आहे. आज सकाळी 11 वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. तसेच, गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी भाजपा, शिवसेनेचे नेते येणार असल्याचे समजते. 

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्विट करुन आप्पा अर्थात गोपीनाथ काकांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.  ‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

याचबरोबर, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन अभिष्टचिंतन केले आहे. "जनसामान्यांचे नेतृत्व, तरुणाईचे आदर्श, शेतकऱ्यांचे कैवारी, राजकारणातील मानबिंदू पद्मविभूषण आदरणीय  शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना!" असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

दरम्यान, गोपीनाथ गडावर गोपीनाथराव मुंडेंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाजपाचे कार्यकर्ते हे परळीकडे निघाले आहेत. समाधी स्थळाच्या दर्शनासाठी येथे नागरीकांची मोठी गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने गोपीनाथ गडावर जय्यत तयारी केली आहे. तसेच, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादानाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्य, त्यांच्या विचाराची प्रेरणा व उर्जा भावी पिढीला मिळावी म्हणून वैद्यनाथ कारखाना परिसरात १२ डिसेंबर २०१४ रोजी गोपीनाथ गडाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर १२ डिसेंबर २०१५ रोजी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले होते. 

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे