शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde: 'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 14:27 IST

Dhananjay Munde: 'देशात आतापर्यंतच्या कुठल्याही राज्यपालाने असे कृत्य केले नसेल.'

मुंबईः आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने तीव्र निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी आपले अभिभाषण अर्ध्यावर सोडले आणि नंतर राष्ट्रगीतालाही उपस्थित राहिले नाही, यामुळे अनेक नेत्यांनी त्यांच्या कृत्यावर आक्षेप घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj)यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांचा धिक्कार असो, अशा घोषणाही सरकारतर्फे देण्यात आल्या.

धनंजय मुंडेंचे टीकास्त्रराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधिमंडळात अभिभाषण पूर्ण केलं नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. राज्यपालांचे अभिभाषण हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सगळ्यात मोठा गाभा असतो. महाराष्ट्राला राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची दिशा लक्षात येते. राज्यपालांनी अभिभाषण न करता ते पटलावर ठेवलं, भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अभिभाषण न करता राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. याची सुरुवात भाजपच्या सदस्यांनी केली, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

महापुरुष-राष्ट्रगीत नकोयमुंडे पुढे म्हणाले की, या राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राची जनता माहीत नाही. महाराष्ट्राची संसदीय कामकाज आणि नियम माहीत नाहीत. त्यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत. त्यांना अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय. एवढंच नाही तर त्यांना देशाचे राष्ट्रगीतही नकोय. हे असं कृत्य आजपर्यंत देशाच्या संसदीय कामात कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यपालांनी घेतला काढता पायअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण करत असताना सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी आपले अभिभाषण अर्ध्यावरच सोडून राज्यपालांनी तेथून काढता पाय घेतला. राज्यपालांनी भाषण अर्धवट केलं आणि त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रगीतालीही ते थांबले नाहीत. यावरुनही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन