शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली हत्या प्रकरणी डीजींचा अहवाल : हिवाळी अधिवेशनापूर्वी उचलबांगडी ?कोल्हापूर आयजी, सांगली एसपींवर ठपका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:54 IST

सांगलीमध्ये पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाची हत्या करण्यात आली. हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यात व अधिका-यांना मार्गदर्शन व नियंत्रण ठेवण्यात सांगलीचे पोलीस

जमीर काझी मुंबई : सांगलीमध्ये पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाची हत्या करण्यात आली. हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यात व अधिका-यांना मार्गदर्शन व नियंत्रण ठेवण्यात सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, कोल्हापूर परिमंडळांचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील अपयशी ठरले, असा ठपका पोलीस महासंचालकांनी बनवलेल्या अहवालामध्ये ठेवल्याचे समजते. या प्रकरणी जनतेतून व्यक्त होत असलेला रोष लक्षात घेऊन अधीक्षक शिंदे यांच्याबरोबरच नांगरे-पाटील यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या कोथळे हत्या प्रकरणी अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी व राज्य गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख संजयकुमार यांनी शनिवारी सांगलीला भेट देऊन पाहणी केली होती. त्याचा अहवाल महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे सादर करण्यात आला असून, येत्या दोन दिवसांमध्ये गृह सचिवाकडे पाठविला जाणार आहे.पोलीस कोठडीत असलेल्या कोथळे व त्याचा साथीदार अमोल भंडारे यांना ६ नोव्हेंबरच्या रात्री उपनिरीक्षक युवराज कामटे व त्यांच्या सहकाºयांनी मारहाण केली. त्यात कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर दोघे जण कोठडीतून पळून गेल्याची डायरी बनवली. तर कोथळेचा मृतदेह अंबोली घाटात नेऊन जाळला. बुधवारी हे प्रकरण उघडकीस आले.मानवी हक्क आयोगाची नोटीसया प्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना नोटीस बजाविली आहे. कोठडीत मृत्यू झाल्यास त्याबाबतची माहिती २४ तासांच्या आत आयोगाला कळविणे बंधनकारक असते, मात्र, त्याबाबत का कळविले नाही? दोषींवर कोणती कारवाई केली? याबाबतचा अहवाल चार आठवड्यांत देण्याची सूचना आयोगाने केली आहे.मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णयकाही महिन्यांपूर्वी सांगलीत सात पोलिसांना सव्वा सहा कोटींचा दरोडा टाकल्याप्रकरणी अटक झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा कोथळेची अमानुष हत्या झाल्याने नांगरे-पाटील, शिंदे हे अधिकाºयांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचा निष्कर्ष अहवालात काढला आहे. मात्र त्यांच्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगलीPoliceपोलिस