शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट; शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:25 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक कॉफीटेबल बुक तयार केले असून, त्यात शरद पवार यांनी फडणवीस यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. त्यांच्या कार्याची गती अफाट आहे हे नाकारता येणार नाही, असे कौतुक ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी एका लेखात केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक कॉफीटेबल बुक तयार केले असून, त्यात शरद पवार यांनी फडणवीस यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्याचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे करण्यात आले. शरद पवार यांनी लेखात म्हटले, दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे? बोलायचेच म्हटले तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. फडणवीस यांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत राहो असे अभीष्टचिंतन करतो.  देवेंद्रजी हुशार, प्रामाणिक राजकारणी आहेत. अभ्यासू, मुत्सद्दी स्वभावाने सर्व आव्हानांचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात यश मिळो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.

राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीही दिल्या शुभेच्छाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे, आदींनी वाढदिवसानिमित्त फोन करून फडणवीस यांचे अभीष्टचिंतन केले.शिंदेंच्या आगळ्या शुभेच्छाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना काव्यमय शुभेच्छा दिल्या. विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे’.., महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा! असे ते एक्सवर म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस