शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांच्या दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसांची IMP माहिती; राज ठाकरेंना भेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 15:36 IST

शाह यांच्या दौऱ्यात मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटी यांच्यात बैठक होणार आहे

मुंबई - केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असून यात ते मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. भाजपा-मनसे यांच्यात जवळीक वाढली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अनेक भाजपा नेत्यांनी अलीकडच्या काळात शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपा-मनसे युतीचं नवीन समीकरण पाहायला मिळेल का याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तत्पूर्वी अमित शाह मुंबई दौऱ्यावर असल्याने याकडे सगळे लक्ष लावून आहेत. 

त्यात अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले की, गणेशोत्सव काळात दरवर्षी अमित शाह मुंबईत येतात. लालबागचा राजा, आशिष शेलारांच्या गणपती दर्शन, मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही गणेश दर्शनासाठी येतील. काही घरगुती गणपतीचं शाह दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय एका शाळेचे उद्धाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची एक बैठक होईल याशिवाय कुठलाही कार्यक्रम अमित शाह यांच्या दौऱ्यात नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात भेट होणार असल्याचं नाकारलं आहे. 

तसेच शाह यांच्या दौऱ्यात मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटी यांच्यात बैठक होणार आहे. त्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई ही अमित शाह यांची जन्मभूमी असल्याने विशेष प्रेम या शहरावर आहे. दरवर्षी ते गणेशोत्सवात गणपती दर्शनासाठी येतात. एल अँन्ड टीकडून एका शाळेचं उद्धाटन करण्यात येणार आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 

फडणवीसांचा विरोधकांना खोचक सल्लासध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते. मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे. ज्याप्रकारे त्यांनी कामे केली आहेत. त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत. मोदींनी विकासाचा एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी लाईन काढण्याचं काम विरोधकांनी करावं असा खोचक सल्ला फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरे