शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'राज्य सरकारकडून माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न', फडणवीसांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 16:55 IST

Lalbaug Ganesh Mumbai: लालबागचा राजा येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी धक्काबुक्की करत परिसरातून बाहेर काढलं.

मुंबई :मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

लालबागच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की

मीडियाशी संवाद साधाना फडणवीस म्हणाले की, 'लालबाग परिसरात झालेली घटना अतिशय चुकीची आहे. हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम करत आहे. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी कुणाला अटक करायची, कुणावर अन्य प्रकारच्या कारवाया करायच्या. सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, लालबागचा राजा इथे जास्त गर्दी नव्हती, माध्यमं आपलं काम करत होते. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना धक्काबुक्की करत अरेरावीची भाषा वापरणणं योग्य नाही,' असंही फडणवीस म्हणाले. 

दंडुकेशाही योग्य नाही'मागील दोन वर्षांपासून राज्यात असे प्रकार सुरू आहेत, याची दखल सरकारने घेतली पाहिजे. इतकी दंडुकेशाही योग्य नाही.  अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही. लालबाग येथे झालेल्या घटनेवर कारवाई झालीच पाहिजे', अशी मागणीही फडणवीसांनी केली.

नेमकं काय घडलं ?लालबाग गणेश मंडळातील लोकांना आणि पत्रकारांना पास देण्यात आले आहे. पण, पास दाखवूनही पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ''हात काय, पाय पण लावेन'', अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. 

टॅग्स :MumbaiमुंबईLalbaugcha Rajaलालबागचा राजाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस