शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:15 IST

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधींना भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल आणि मेक इन इंडिया या उपक्रमाबद्दल काहीच माहिती नसून त्यांना गृहपाठाची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींना मेक इन इंडिया माहित नाही, त्यांना आपल्या देशात कशाचे उत्पादन होते, हे माहिती नाही.त्यांना कदाचित हे देखील माहिती नसेल की, काँग्रेस सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणले. मोदींनी गेल्या १० वर्षात भारताला चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली. पुढील दोन वर्षात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. राहुल गांधींना गृहपाठ करण्याची गरज आहे."

मेक इन इंडियाबाबत राहुल गांधी काय म्हणाले?राहुल गांधींनी मेक इन इंडियाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की, "मेक इन इंडियाच्या माध्यमातून कारखाने अधिक उत्पादन करतील, रोजगार वाढेल, असे सांगण्यात आले. मग आज उत्पादन इतक्या निचांकी पातळीवर का पोहोचले? बेरोजगारी वाढत आहे. चीनमधून होणारी आयात दुप्पटीने का वाढली? २०१४ पासून देशाच्या एकूण जीडीपीतून उत्पादनाचा वाटा घसरून १४ टक्क्यांवर आला. फक्त घोषणा करून उपयोग नाही, भारताला आता खरी सुधारणा आणि मजबूत आर्थिक पाठबळ हवे आहे, जे लाखो लघु व मध्यम उद्योगांना सक्षम बनवेल."

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीMake In Indiaमेक इन इंडिया