शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

देवेंद्र फडणवीसांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 13:39 IST

माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असेही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी या चुकीबद्दल माफी मागावी अशी मागणी शाहूप्रेमींनी केली आहे.'छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही'

मुंबई: छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक 'कार्यकर्ते' असा केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफर टीका होत आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी या चुकीबद्दल माफी मागावी अशी मागणी शाहूप्रेमींनी केली आहे.

यातच आता खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही ट्विट करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच, माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असेही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दुसरे ट्विट करत छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही, असे म्हणत वाद निर्माण करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.  छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी एका वादग्रस्त ट्विटवरून वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलं होतं. त्यावरून घमासान सुरू असताना काही जणांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनाही या वादात ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत वाद निर्माण करणाऱ्यांना कडक शब्दात सुनावलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली. या वादावरून संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे भोसले?छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही! छत्रपतींविषयी जेव्हा केव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेव्हा केली गेली, तेव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजामधील माझ्या चालू भाषणात जेव्हा मला हे कळलं तेव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तेव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?

काल माझ्या घरगुती कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याने, समाज माध्यमांमध्ये घडत असलेली चर्चाही मला माहिती नव्हती. त्याआधी दिवसभरात माझ्या सहकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनाची तसेच आमच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाची पोस्ट करायला सांगितली होती.संध्याकाळी जेव्हा मी फोन चालू केला तेव्हा पत्रकाराचा फोन आला होता. त्यांना मी प्रतिक्रिया सुद्धा दिली. तोपर्यंत ते वादग्रस्त ट्विट डिलिट केलं गेलं होतं. म्हणून मी त्यावर काही बोललो नव्हतो. तरीही मी प्रतिक्रिया दिली.

शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या चरित्रातील आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच दिल्लीमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली. राष्ट्रपती असतील किंवा परदेशी राजदूत असतील या सर्वांना महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला मी भाग पाडले. आज जगभर त्या शिवजयंतीची दखल घेतली जात आहे.

संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यात देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं होतं. जवळपास ७० खासदार जमले होते. शाहू महाराजांवरील जयसिंगराव पवारांचे हजारो पुस्तके मी देशी विदेशी अतिमहत्वाच्या व्यक्तींना भेट म्हणून दिले आहेत. त्यातून महाराजांचा इतिहास पोचवण्यास मदतच होत आहे.

महाराष्ट्रात सारथी संस्थेच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन उभं केलं. ते राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. त्याला जिवंत ठेवण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो होतो. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी जे जे केलं. त्या गोष्टींमधून आदर्श घेऊन मी कार्य करत असतो. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी त्याच उद्देशाने उतरलो होतो. आजही आहे. कोल्हापुरातील महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या करत असताना मी स्वतःचा विचार करत नाही. कारण, त्यावेळी माझ्यासाठी देशहित , समाजहित महत्वाचे असते.

सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवण्याचा माझा स्वभाव आहे. शिवरायांपासून, राजर्षींपर्यंत माझ्या सर्व पूर्वजांनी हीच शिकवण दिली आहे. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र