शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती उदयनराजे म्हणजे मुक्त विद्यापीठ; फडणवीसांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 19:31 IST

जे उदयनराजेंच्य नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना राजे शासन करतात.

सातारा: छत्रपती उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते महाराष्ट्राच्या राजकारणातील मुक्त विद्यापीठ आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. साताऱ्याचे खासदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले आज त्यांचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त आज साताऱ्यात जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांच्यावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी म्हटले की, उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी ते आमच्यासाठी एखाद्या मुक्त विद्यापीठाप्रमाणे आहेत. यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या कारभाराच्या पद्धतीकडेही लक्ष वेधले. जे उदयनराजेंच्य नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना राजे शासन करतात, अशी मिष्किल टिप्पणी त्यांनी केली. परंतु, एरवी उदयनराजे म्हणजे मित्रांचा मित्र, प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्यायाविरुद्ध कोणतीही तमा न बाळगता आवाज उठवणारी व्यक्ती असल्याचे फडणवीसांनी म्हटले. उदयनराजे मला अनेकदा भेटत असतात. त्यावेळी ते स्वत:साठी काही न मागता साताऱ्याच्या विकासाचीच मागणी करतात. आमच्या चंद्रकात पाटलांनी यापैकी काही मागण्या पूर्णही केल्या आहेत. आम्ही सगळे त्यांच्यावर छत्रपतींचे वंशज म्हणून प्रेम करतो, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच उदयनराजे यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची केलेली मागणी आज त्यांच्या वाढदिवशी मान्य करत असल्याची घोषणाही यावेळी फडणवीसांनी केली. 

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर असताना उदयनराजेंना शरद पवारांसमोर मिठी मारली. राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरु झाली आहे. आजच्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण,  आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार