शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस सत्तेबाहेर ते उपमुख्यमंत्रिपदी...; काही तासांत बदलले चित्र...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 07:04 IST

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची ‘सागर’ या फडणवीस यांच्या बंगल्यावर दुपारी बंदद्वार चर्चा झाली.  गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून झालेल्या निर्णयाची माहिती  फडणवीस यांनी शिंदेना दिली.

मुंबई : विरोधी पक्षनेत्याच्या दमदार भूमिकेत राहिलेले देवेंद्र फडणवीस सायंकाळी मुख्यमंत्री होणार असे निश्चितपणे वाटत असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आपण मंत्रिमंडळात असणार नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, नंतर काही वेळातच अतिशय नाट्यमय घटना घडल्या आणि फडणवीस यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची ‘सागर’ या फडणवीस यांच्या बंगल्यावर दुपारी बंदद्वार चर्चा झाली.  गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून झालेल्या निर्णयाची माहिती  फडणवीस यांनी शिंदेना दिली. गेल्या चार दिवसांत भाजपचे पक्षश्रेष्ठी, फडणवीस आणि शिंदे यांच्यात सातत्याने चर्चा होत होती. चार दिवसांपूर्वी अमित शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बडोद्याला जी चर्चा झाली त्यात शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शहा यांनी सुतोवाच केले व मोदी यांच्याशी चर्चा करून नंतर अंतिम निर्णय कळविला जाईल, असे सांगितल्याची माहिती आहे.

चर्चेतल्या थिअरीज... -फडणवीसांनी पत्रपरिषदेत आपण मंत्रिपदी असणार नाही, असे जाहीर करायचे, नंतर पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश द्यायचे व त्यांनी ते स्वीकारायचे ही स्क्रिप्ट ठरली होती.

फडणवीस यांनी ते मंत्रिमंडळात राहू इच्छित नाहीत असे आधी सांगितले, त्याला पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिली. मात्र, पक्षाचे आमदार या प्रकाराने नाराज असल्याचे लक्षात आल्याने फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याची गळ घातली गेली की, सगळे आधीपासूनच ठरले होते या दोन थिअरींची चर्चा आहे.

पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांची महाराष्ट्राप्रतीची निष्ठा व सेवाभावच दर्शविते. मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करीत आहे. ज्या पक्षाने मला राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचविले त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोपरी आहे.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा