शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार'- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 17:38 IST

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक पार पडली.

मुंबई: आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत नीती (NITI) आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगोसबत बैठक झाली. आयोगाचे सीईओ आणि सर्वजण उपस्थित होते. बैठकीचे कारण म्हणजे, नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणे. बैठकीत राज्याकडून प्रेजेंटेशन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला तत्वतः संमती दाखवली आहे. अशाप्रकारची इंन्स्टिट्युट आम्ही तयार करू, लवकरच यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊ,' असं फडणवीस म्हणाले. 

अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झालीफडवीस पुढे म्हणाले, 'राज्यात मॉनेटायझेशन ऑफ असेटचा विषय असेल, ब्लॉकचेन ऑफ अॅग्रीकल्चर असेल किंवा ट्रांसपोर्टेशन ईव्हीवर नेण्याचा विषय असेल, किंवा ड्रोनचा वापर करुन हेल्थकेअर आणि शेतीच्या क्षेत्रात परिवर्तन करण्याचा विषय असेल, अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली. यावर आयोगाचा प्रचंड अभ्यास आहे. विशेष म्हणजे, आयोगाने या संदर्भात एक टूल तयार केले आहे. आज सर्व विभागामध्ये डेटा तयार होतो, पण त्या विभागाचे कोरिलेशन होत नाही. पण, टूलमध्ये सर्व डेटा एकत्रित होऊन, याचा अभ्यास केला जाईल. त्या आधारे निर्णय घेता येतील, ही यंत्रणा राज्यात उभी करण्यावर चर्चा केली, अशीही माहिती त्यांनी दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईलयावेळी फडणवीसांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, 'संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी मदत केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच यासंदर्भात घोषणा केली आहे. आधी काही जीआर निघाले आहेत, यापुढेही निघतील.' यावेळी फडणवीसांनी एटीएसचेही कौतुक केले. ते म्हणाले, 'महाराष्ट्र ATSने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. 15 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांच्या प्रमुखाला नालासोपारामधून पकडून झारखंड पोलिसांच्या हवाली केले आहे.'  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNIti Ayogनिती आयोगEknath Shindeएकनाथ शिंदे