शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे आणि फडणवीसांमध्ये मध्यरात्री सव्वातास बैठक, मोहित कंबोजही उपस्थित; चर्चांना उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 09:34 IST

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई- राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व खात्यांच्या रितसर बैठका शिंदे आणि फडणवीसांकडून घेतल्या जात आहेत. यातच काल रात्री उशिरापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या 'अग्रदूत' बंगल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास सव्वातास चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीसाठी भाजपा नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

रविवारी राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याच्या स्ट्रॅटजीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय खातेवाटपासंदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. 

एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याची शिवसेना खासदारांची मागणी, पण ठाकरेंकडून केराची टोपली

देवेंद्र फडणवीस रात्री जवळपास १२ वाजून ४७ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. त्यानंतर रात्री १ वाजून ५० मिनिटांनी फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून बाहेर निघाले. या बैठकीबाबत एकनाथ शिंदे यांना प्रसार माध्यमांनी विचारलं असता अशा भेटी आता रोजच होत राहणार, असं म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील चर्चा अजून गुलदस्त्यात आहे. 

फडणवीस निघाल्यानंतर काही वेळानं एकनाथ शिंदे देखील बाहेर पडले आणि गोव्याला निघाले. गोव्यात थांबलेल्या बंडखोर आमदारांसोबत शिंदे चर्चा करणार आहेत. शिंदे सर्व आमदारांना आज मुंबईत घेऊन येणार असल्याचं बोललं जात आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना