शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

व्यासपीठावरच देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 16:26 IST

मागील ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे इतके प्रकल्प राज्यात उभे करू शकलो असं फडणवीस म्हणाले.

शिर्डी – महाराष्ट्रातील ५० टक्के भागात दुष्काळ आहे. जोपर्यंत या परिसरात पाणी पोहचत नाही तोवर शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. आमच्याकडे आराखडा तयार आहे, त्या प्रकल्पांना केंद्राने मदत केली महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यासपीठावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्र सरकारच्या निधीची मागणी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील ५० टक्के असा भाग आहे जो दुष्काळग्रस्त आहे.  ज्याठिकाणी पाऊस जास्त पडत नाही. पाणी नाही. या भागाला जोपर्यंत पाणी पोहचवत नाही तोवर महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. केवळ तुमच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकतो. पश्चिमी नद्यांचे पाणी जे समुद्रात जाते, ते गोदावरीत आणून अहमदनगरपासून संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू शकतो असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत या योजनेची पूर्ण व्यवस्था, संपूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे. प्रकल्पही तयार केलाय. त्याचसोबत विदर्भात वैनगंगा नदीतून वाहणाऱ्या १०० टीएमसी पाण्यापैकी ६७ टीएमसी पाणी आपण दुष्काळग्रस्त भागातून नळगंगापर्यंत आणू शकतो. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला आपण कायम दुष्काळमुक्त करू शकतो. तुम्ही आशीर्वाद द्या, याआधीही केंद्राने मदत केली आहे आणखी थोडी मदत या प्रकल्पांना केंद्र सरकारने केली तर आमच्या पिढीने महाराष्ट्रात दुष्काळ पाहिला परंतु येणारी पिढी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

९ वर्षात ३० हजार कोटी केंद्राने दिले

मागील ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे इतके प्रकल्प राज्यात उभे करू शकलो. पंतप्रधानांपासून प्रेरणा घेऊन आम्हीदेखील ज्याप्रकारे शेतकऱ्यांना निधी दिला जातो तसे महाराष्ट्रानेही निर्णय घेतला आणि नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. निळवंडे सारखा प्रकल्प सुरुवात माझ्या जन्माच्या आधी झाली होती. आज त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय म्हणजे कित्येक वर्ष लोकांनी हा प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहिली. २०१६-१७ मध्ये आम्ही निळंवडे प्रकल्पाला चालना दिली, विशेष निधी उपलब्ध करून दिला. राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे त्यावेळी विरोधात होते. परंतु त्यांनी सहकार्य केले त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. आज एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्याचेही उद्घाटन झाले आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प