शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'वेदांतावरुन विरोधकांची नौटंकी सुरू, कंपनीचा आधीच निर्णय झाला होता', फडणवीसांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 18:19 IST

'वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल.'

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांची नौटंकी सुरू आहे,' अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, 'राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक आणू', असेही म्हणाले.

यावेळी फडणवीस म्हणाले, 'माझी फायनान्स विभागासोबत आढावा बैठक झाली. पुढच्या काळात अतिरिक्त साधण संपत्ती करून मोठी गुंतवणूक कशी आणता येईल, ते आम्ही पाहणार आहोत. जीडीपीच्या साडेतीन-चार टक्के गुंतवणूक कॅपिटल इनव्हेसमेंट म्हणून झाली पाहिजे किंवा एकूण बजेटच्या 25 टक्क्यापर्यंत कशी नेता येईल, त्याबद्दल विचार सुरू आहे,' असे ते म्हणाले.

वेदांतावरुन विरोधकांना टोलायावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. 'वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांची नौटंकी सुरू आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही वेदांता कंपनीला जागा दाखवली होती. तेव्हाच आम्हाला समजलं होते की, ते गुजरातला जाणार आहेत. त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र लिहिली, स्वतः जाऊन भेटलो. त्यांना चांगले पॅकेज देऊ, चांगली जागा देऊ, असेही सांगितले होते. पण, त्यांचा निर्णय आधीच झाला होता. आता महाविकास आघाडी नौटंकी करत आहे. पण, वेदांतापेक्षा चांगली गुंतवणूक राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल,' असे फडणवीस म्हणाले. 

विविध योजना राज्यात येणारफडणवीस पुढे म्हणाले की, 'विविध राज्यात तिथल्या सरकारांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्या गोष्टी पाहण्यासाठी मंत्री जाणार आहेत. त्या योजना महाराष्ट्रात कसाप्रकारे आमलात आणता येतील, त्याबाबत विचार सुरू आहे. जसे, गुजरात सरकारने एक डॅशबोर्ड सुरू केला आहे, ज्यात राज्यातील सर्व प्रकल्पांबाबत सर्व माहिती दिली जाते. तसाच डॅशबोर्ड महाराष्ट्रात करता येईल का, यावर विचार सुरू आहे. तिकडे, हरियाणामध्येही परिवार पहेचानपत्र योजना आहे, याशिवाय विविध राज्यात ज्या चांगल्या योजना सुरू आहे, त्या राज्यात कशा सुरू करता येतील, यावर आम्ही विचार करत आहोत,' अशी माहिती फडणवीसांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी