शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: "आम्ही भजन करायला पक्ष चालवत नाही, मुर्खांच्या नंदनवनात...."; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:50 IST

"या जगात कुणीच कुणाला संपवू शकत नाही."

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग अशी दुहेरी लढाई सुरू आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर घडलेल्या विविध घटना यांचा राज्याच्या राजकारणावर खूप परिणाम झाल्याचे दिसत आहे. जून महिन्याच्या अखेरीस अचानक शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आणि त्यानंतर भाजपासोबत त्यांनी सत्तास्थापना केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गटाने भाजपावर पक्ष फोडल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यावर बोलणे भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी टाळले. पण अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखतीत यासंदर्भात बोलताना सडेतोड मत मांडले. यावेळी त्यांनी अतिशय विखारी शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्यावर टीका केली.

शिंदे गट जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून बाहेर पडला, त्यावेळी भाजपाची त्यांच्यावर नजर होती का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीसांनी रोखठोक उत्तर दिले. "आम्ही कोणाच्या पाठीशी होतो का, हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. ते लोक स्वत: बाहेर पडले होते. विरोधी पक्षात असताना नैराश्यातून किंवा सत्तेच्या लालसेपोटी काही नेतेमंडळी बाहेर पडली तर आपण समजू शकतो. पण तुमच्याकडे सत्ता असताना, तुम्ही स्वत: मुख्यमंत्री असताना जर तुमच्याकडे ७५ टक्के लोक तुमच्या नाकाखालून बाहेर पडत असतील तर त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं. ते लोक बाहेर पडले. आम्हाला संधी होती, आम्ही त्याचा फायदा केला. कारण आम्ही भजन करायला पक्ष चालवत नाही. जगात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. त्यामुळे 'याला संपवू त्याला संपवू' असा मुर्ख्यांच्या नंदनवनात आम्ही वावरत नाही," असे अतिशय स्पष्ट शब्दांत फडणवीसांनी उत्तर दिले आणि उद्धव ठाकरेंना सुनावले.

"आम्हाला राजकारण करायचंच आहे. केवळ सत्तेचं नव्हे तर विकासाचं राजकारण आम्हाला करायचं आहे. एक व्यक्ती इतके आमदार सोबत घेऊन पक्षातून बाहेर पडली आहे आणि सत्ता स्थापन न करता भजन करत बसायचं असं शक्य नव्हतं. त्यामुळे राजकारणात जे योग्य होतं ते आम्ही केलं. २० जून रोजी एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत २९ आमदार होते. हे सर्वजण सुरतला गेले. ५५ पैकी २९ आमदार आणि गटनेते पक्षाबाहेर पडले होते. याचाच अर्थ शिंदेंसोबत जास्त आमदार होते. म्हणजेच पक्ष गटनेत्याजवळ होता. त्याच दिवशी आम्ही सरकार स्थापन केलं असतं. त्यानंतर २५ जूनपर्यंत म्हणजेच पुढच्या ५-६ दिवसात त्यांच्यासोबत ४० आमदार होते. आम्हाला संधी होती आम्ही त्याचा फायदा घेतला,” असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना