शिवजयंतीच्या काही दिवस आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने राज्यात मोठा वाद उफाळून आला होता. भाजपने जोरदारपणे हा मुद्दा उचलून धरल्याने सकपाळ यांनी माफी मागितली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत जोरदार प्रत्त्यूत्तर दिले.
देशाच्या इतिहासासोबत छेडछाड केली गेली होती. इतिहासाच्या पुस्तकात मुघलांवर १७ पाने होती, तर शिवाजी महाराजांवर एक पॅरेग्राफ होता. टिपू सुलतान इंग्रजांसोबत लढला असेच या इतिहासातून शिकविले गेले. परंतू, तो देशासाठी लढला की स्वत:च्या राज्यासाठी ते शिकविले नाही. त्याने ७५ हजार हिंदूंची हत्या केली, ३३ हजार नायरांची कत्तल केली, हे सांगितले गेले नाही. या गोष्टी हळू हळू समोर येऊ लागल्या आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
एनसीआरटीच्या पुस्तकात आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्यावर २० पाने आहेत. हा इतिहास आम्हाला तेव्हा शिकविला गेला असता तर आज मुस्लिमांमध्ये औरंगजेब हिरो ठरला नसता, असा आरोप फडणवीस यांनी केला. या देशात मुस्लिम देखील राष्ट्रभक्त आहेत, त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाही. परंतू जे लोक आक्रमणकाऱ्यांना हिरो मानतील त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
तसेच टिपू सुलतान चांगला होता की वाईट याला आक्षेत नाही, ती चर्चा होतच राहिल. परंतू, टिपू सुलतान हा शिवाजी महाराजांएवढा मोठा राजा होता, असे कोणी म्हणत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. शिवरायांएवढेच टिपू बाबतही चांगले बोलले गेले पाहिजे असे सांगत असेल तर त्याला आमचा विरोध आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Fadnavis criticized comparing Tipu Sultan to Shivaji Maharaj in assembly. He highlighted historical distortions, emphasizing Tipu's atrocities against Hindus and Nairs. Fadnavis asserted Shivaji Maharaj's unparalleled greatness, opposing any attempts to equate Tipu with him.
Web Summary : फडणवीस ने विधानसभा में टीपू सुल्तान की शिवाजी महाराज से तुलना की आलोचना की। उन्होंने ऐतिहासिक विकृतियों पर प्रकाश डाला, जिसमें टीपू के हिंदुओं और नायरों के खिलाफ अत्याचारों पर जोर दिया। फडणवीस ने शिवाजी महाराज की अद्वितीय महानता पर जोर दिया, और टीपू को उनके बराबर करने के किसी भी प्रयास का विरोध किया।