शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Devendra Fadnavis vs Ajit Pawar: "ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही..."; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:59 IST

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यांचा घेतला खरपूस समाचार

Petrol Diesel Prices in Maharashtra: राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या ( CM Eknath Shinde ) नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंधनाचे दर काही अंशी कमी करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. ही दर कपात राज्यात मध्यरात्रीपासून लागूदेखील झाली. पण कर कपात तुटपुंजी असल्याचे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ( Ajit Pawar) म्हटले. त्यावर फडणवीसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. "ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही, त्यांना बोलायचा अधिकार तरी काय आहे? मला तर आश्चर्य वाटते की ही मंडळी आता बोलू तरी कशी शकतात. इतकी मागणी होऊनसुद्धा त्यांनी निर्णय घेतला नव्हता. खुद्द पंतप्रधानांनी विनंती करूनही ठाकरे सरकारच्या लोकांनी निर्णय घेतला नाही. आणि आता आम्ही लोकांच्या भल्यासाठी ही गोष्ट करत असताना हे लोक आम्हाला विचारत आहेत. आम्ही लोकांसाठी निर्णय घेत दर कपात केली आहे आणि भविष्यात दर आणखी कमी करू", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारासंह इंधन दर कपातीच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

अजित पवार नक्की काय म्हणाले होते?

"पेट्रोल आणि डिझेलवरील काही प्रमाणात टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी अडीच वर्ष अर्थमंत्री राहिलोय. मागील अर्थसंकल्पात गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात कमी केल्या होत्या. साडे तेरा टक्क्यांचा टॅक्स तीन टक्क्यांवर आणला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे मागणी करत होते की, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील दरात ५० टक्क्यांची कपात करावी. मग आता तेच सत्तेत असताना ५० टक्के टॅक्स कमी का नाही केला? विरोधात असताना मागणी करायची, अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची", असा टोला अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला होता.

छगन भुजबळांनीही केली दर कपातीच्या निर्णयावर टीका

"भाजपचे केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले. कारण एकीकडे राज्य सरकारने सर्व वस्तूंवरील जीएसटी ५ टक्क्यांनी वाढविला, वीज बिल वाढवलं, एलपीजी ५० तर सीएनजी ४ रुपयांनी महाग केलं आणि दुसरीकडे केवळ ५ रुपयांनी पेट्रोल आणि ३ रुपयांनी डीझेल कमी केले. हे सरकार किती हुशार आहे ते यावरूनच समजतं. एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायचा अशी पेट्रोल व डिझेलची दरकपात आहे", अशा शब्दांत छगन भुजबळांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPetrolपेट्रोलDieselडिझेल