शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 07:31 IST

बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही.

देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेहिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे नुसते नाव नाही, तर उत्साह आणि प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. राष्ट्रवादाचा निर्मळ झरा आहे. आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कधीही तत्त्वांशी तडजोड न केलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे म्हणूनच आम्हा सर्वांसाठी ऊर्जास्रोत आहेत, प्रेरणास्थान आहेत, मार्गदर्शक आहेत.बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही. विचारांवर ठाम श्रद्धा आणि त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी यामुळे ते हिंदुत्वाच्या चळवळीतील तपस्वी आणि आदरणीय नेते बनले. अगदी छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याला त्यांच्या बोलण्यातून ऊर्जा मिळायची. त्यांची ओजस्वी वाणी, घणाघाती प्रहार यांनी एक कालखंड गाजविला आणि आजही त्यांची भाषणे ऐकत राहावीशी वाटतात. आजही ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरित करतात. विचारनिष्ठा, स्वाभिमान आणि त्यासाठी प्रसंगी वाटेल त्या संकटाला तोंड देण्याची तयारी याबद्दल त्यांचे विचार ऐकत राहणे आणि त्यावर वाटचालीसाठी स्वत:ला संकल्पबद्ध करीत राहणे, अशी किमया फार कमी नेत्यांना साधता येते. स्व. बाळासाहेब हे त्यापैकी एक. म्हणूनच ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार सातत्याने प्रेरणा देत असतात आणि भविष्यातही देत राहतील.राजकारणात छोट्या मनाचे अनेक नेते आपण पाहतो. पण, बाळासाहेबांचे मन राजासारखे होते. व्यापक आणि दूरदृष्टी त्यांच्या ठायी होती. त्यामुळेच महाराष्ट्रात निष्ठावंतांची एक मोठी फौज ते उभे करू शकले. त्यांच्या विचारांचा आधार, केंद्रबिंदू हा राष्ट्रीयत्वाचा होता. सत्तेसाठी, पैशासाठी कोणतीही तडजोड करू नका, असे ते सातत्याने सांगत.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र