शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: "संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही"; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 16:23 IST

Devendra Fadanvis: "कोल्हापूरमध्ये सिंपथीमुळे काँग्रेसचा विजय, 2024 मध्ये ही जागा आम्हीच जिंकणार."

पुणे: रामनवमीपासून देशातील अनेक भागात जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपवर दंगली पेटवल्याचा आरोप केला आहे. त्या आरोपाला आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बोचऱ्या शब्दात उत्तर दिलंय. "संजय राऊत यांना काही काम धंदा नाही," अशी टीका फडणवीसांनी केली.

'कोल्हापूरच्या निकालावर समाधानी'पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केले. ते म्हणाले की, "निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. आम्ही एकटे लढूनही आमच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आमच्याविरोधात तीन पक्ष एकत्र होते, तरीदेखील त्यांची मते वाढली नाहीत. कोल्हापूरमध्ये सिंपथीमुळे काँग्रेसचा विजय झाला. पण, 2024 मध्ये कोल्हापूरची ही जागा आम्हीच जिंकणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

'संजय राऊत यांना काही काम-धंदा नाही'देशात दंगली पेटवम्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्या आरोपाबाबत पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "संजय राऊत अतिशय फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहे. त्यांना सध्या काही कामधंदा उरलेला नाही. त्यांच्यावर कितीवेळा बोलायचं?" अशी बोचरी टीका फडणवीसांनी यांच्यावर केली.

'अयोध्येला कोणीही जाऊ शकतं'यावेळी फडणवीसांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, "अयोध्येचा दौरा कुणीही करू शकतो. प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी कुणी जात असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्हीदेखील अनेकदा त्या ठिकाणी जात असतो. कोणाला तिकडे जावं वाटतं असेल, तर त्यात गैर काही नाही. श्री रामाचे भव्य मंदिर तिकडे होत आहे, ते पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे." 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे