शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

टोल माफी असतानाही प्रवाशांच्या खिशाला कात्री; कोकणात जाताना प्रवास विघ्ने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 05:54 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफी पास असलेल्यांसाठी ठेवण्यात आली होती

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी  देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु टोलमाफी असतानाही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेली; त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफी पास असलेल्यांसाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे पास असून फास्टॅगमधून पैसे कापले जात असल्याचे अनेकांनी सांगितले. टोल माफी ही एक राजकीय घोषणा होती. कसलेही नियोजन नाही. त्यामुळे ज्यांच्या कारवर फास्टॅग त्यांचे पैसे कट होणारच. हीच सवलत द्यायची  तर टोलनाक्यावर तशा सूचना हव्यात ते न केल्याने हा प्रकार घडत असल्याचे एका वाहनचालकाने सांगितले.

गणेशभक्त अडकले वाहतूककोंडीतलाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आसुसलेल्या कोकणवासीयांनी गावाकडे जायची एसटी - रेल्वे धरली खरी, पण वाटेत अनेक विघ्न आल्याने गावी पोहोचण्यासाठी १८ ते २४ तास लागत आहेत. 

शनिवारी रात्री आठ वाजता निघालेले प्रवासी रविवारी सायंकाळ चारपर्यंत संगमेश्वरापर्यंतच पोहोचले होते. गेली १७ वर्षे मुंबई - गोवा हायवेचे काम रखडले असल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. - यशवंत जड्यार, सचिव, वसई - सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना

ठाणे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहावर छप्पर नसल्याने प्रवाशांना भर पावसात गाडीची वाट पाहावी लागली. गेल्या वर्षभरापासून ही स्थिती आहे. - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ

एखाद्या गाडीवर काही दंड असल्यास तो आधी तपासला जातो आणि मग टोलमाफीचा पास देतात. पास आणायला जाण्यापूर्वी वाहनचालकांनी दंड आहे की नाही तो बघून घ्यावा. - अभिषेक साळवी, प्रवासी

टॅग्स :tollplazaटोलनाकाGanesh Mahotsavगणेशोत्सव