शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती, पण...”; एकनाथ शिंदेंनी सगळे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:14 IST

Eknath Shinde News: आमचा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde News: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पक्षातील अनुभवी, बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच, डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट जाहीर केले. ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे. पक्षातील दिग्गज, अनुभवी आणि अनेक इच्छुक नेत्यांना डावलून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. 

ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती. शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करत आहे. आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली. शिवसेनेने केलेली निवड सार्थक ठरेल. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांची भावना होती. शरद पवार यांची विनंती आणि सर्वांच्या म्हणण्यानुसार निवडणूक बिनविरोध झाली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आमचा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे

आमचा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यामुळे आम्ही डॉ. ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला राज्यसभेची संधी दिली आहे. त्यांनाही याची पूर्वकल्पना नव्हती. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. त्या राज्यसभेमध्ये पक्षाची भूमिका, काम आणि ध्येय-धोरणं लोकांपर्यंत नक्की पोहोचवतील. महाराष्ट्रातील तसेच देशातील प्रश्नांना त्या राज्यसभेत प्राधान्य देतील. शिवसेनेने केलेली ही निवड सार्थक ठरेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संधींचे सोने करेन

मला वाटले नव्हते की, कधी हा दिवस येईल. कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितला. लहानपणापासून भुकेचे चटके सोसले. लहानपणापासून संघर्ष केला. त्यानंतर शिवसेना सेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा वाटलेले की, यापेक्षा मोठा काहीही होऊ शकत नाही. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कुठल्याही पद्धतीचे आरक्षण नसताना माझ्यासारखी दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचते आहे, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार. मी खूप साधी मुलगी आहे. मी खूप गरीब मुलगी आहे. मला राजकारण कळत नाही. पण मला विश्वास आहे की, माझे नेते एकनाथ शिंदे यांनी जी संधी मला दिली, त्या संधीचे सोने मी करेन, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सोलापूरतून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत असताना दलित पँथरच्या माध्यमातून सामाजिक लढा जिवंत ठेवला होता. हाच वारसा घेऊन ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केली. पाच भाषांवरील प्रभुत्व आणि आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यास ही त्यांची मुख्य ओळख आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Jyoti Waghmare's Rajya Sabha Seat: Shinde Reveals the Untold Story

Web Summary : Eknath Shinde surprised all by nominating Jyoti Waghmare for Rajya Sabha. Waghmare didn't ask, but Shinde wanted to empower a common worker. He emphasized her connection to grassroots activism and commitment to Maharashtra's issues in parliament. Waghmare expressed gratitude, promising to fulfill Shinde's faith.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना