शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Cabinet Expansion: संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:31 IST

Maharashtra Cabinet Expansion: ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील, त्यांना नैतिक अधिकार नाही, त्यांनी आधी आरसा पाहावा, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला दिले.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्याव्या लागलेल्या संजय राठोड यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केले आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी या निर्णयावरून नव्या शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे, ते आता देवेंद्र फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. 

मला अतिशय आनंद आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे

मला अतिशय आनंद आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. सर्व सक्षम मंत्री आहेत, लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. जे विनाकारण आरोप करत आहेत त्यांना हे उत्तर आहे. खातेवाटप लवकरच केले जाईल, असे सांगत संजय राठोडांच्या विषयावर याआधीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पुरेसे आहे, असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. तसेच महिलांना मंत्रिपद दिले नाही, हा जो आक्षेप आहे, तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. मागील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात पाच मंत्री घेतले होते, तेव्हा कोणत्या महिलेला स्थान दिले होते, असा उलटप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 

दरम्यान, ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर खटले चालू असतील. अशा पक्षाला अशी टीका करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा आरसा पाहावा आणि त्यानंतरच अशा प्रकारचे ट्विट करावे, असे जोरदार प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दिले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस