शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांना केली ही विनंती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:48 IST

Eknath Shinde Birthday : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ फेब्रुवारीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ९ फेब्रुवारी रोजी येणारा आपला वाढदिवस यंदा साजरा न करण्याचे त्यांनी जाहीर केले असून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही कोणतेही सोहळे न करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

"मी माझा सहकारी आणि मित्र गमावला" या निर्णयाबाबत बोलताना एकनाथ शिंदे भावूक झाले. "अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मी व्यक्तिश: माझा एक जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक मित्र गमावला आहे. पवार कुटुंबावर कोसळलेला हा दु:खाचा डोंगर मोठा आहे आणि अशा परिस्थितीत वाढदिवसाचा उत्सव साजरा करणे मला मनाला पटणारे नाही," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शुभेच्छांचे होर्डिंग आणि पुष्पगुच्छ नकोत! 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही होर्डिंग्ज किंवा बॅनर लावू नयेत. कोणीही शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू घेऊन येऊ नये. कोणत्याही प्रकारचे सोहळे, केक कापणे किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि निधन पावलेल्या नेत्याबद्दल आदर राखून सर्वांनी संयम पाळावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde cancels birthday after Pawar's demise, requests restraint.

Web Summary : Following Ajit Pawar's death, CM Shinde cancelled his birthday celebrations. He urged Shiv Sena workers to avoid festivities, honoring Pawar's memory and acknowledging the state's grief. Shinde requested no hoardings, flowers, or public events.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाShiv Senaशिवसेना